Home उद्योग / शिक्षण वार्ता बेस्ट मधे घुसलेल्या  “वेस्ट लोकां”चं  काय करायचं ?  *बसला हॅन्डब्रेक न...

बेस्ट मधे घुसलेल्या  “वेस्ट लोकां”चं  काय करायचं ?  *बसला हॅन्डब्रेक न लावता प्रवर्तकाकडे वेळ घेण्यासाठी बेस्ट बस चालक गेला,बस सुरू होऊन चहाच्या टपरीवर धडकली*

189
0

बेस्ट मधे घुसलेल्या  “वेस्ट लोकां”चं  काय करायचं ?

*बसला हॅन्डब्रेक न लावता प्रवर्तकाकडे वेळ घेण्यासाठी बेस्ट बस चालक गेला,बस सुरू होऊन चहाच्या टपरीवर धडकली*

दिनांक 11/01/25 रोजी उपरोक्त नमूद वेळी व ठिकाणी सदर बस गाडी आगरकर चौक वरून कन्नमवार नगर येथे आली असता बस चालकांनी गाडी बसस्थानक मध्ये उभी केली व प्रवर्तका कडे बस ची वेळ घेण्यास गेले, त्या वेळेस बस चालकांनी बस गाडीचा हेंड ब्रेक न
लावण्याने बसगाडी पुढे गेली व पुढील चहाच्या टपरी ला धडकली त्या मध्ये चहाच्या टपरीचे किरकोळ नुकसान झाले व बस गाडीच्या पुढील काचेला तडे जाऊन नुकसान झाले आहे, तसेच चहाच्या टपरी जवळ उभे असलेल्या बिल्डिंग मधील काम करणार्‍या एक रोजंदारी कामगार श्री. लिफन चंद्ररडा राणा वय ; 20 यांच्या डाव्या हाताला खरचटले आहे ते कुठे ही रुग्णालयात उपचार घेण्यास गेले नाही, सदर घटणे बाबत कन्नमवार नगर पोलिस ठाणे मध्ये गेले असता सदर कामगार यांनी वैयतिक सगीतले की त्यांची कोणतीही तक्रार नाही, सदर बाबत पोलिस निरीक्षक श्री संतोष कोळी यांनी संगितले की, सध्या सदर घटनेबाबत कोणाचीही तक्रार नसल्याने, तक्रार नोंद करता येत नाही, परंतु सदरघटने बाबत तक्रार आल्यास बस चालकाला पोलिस स्थानक मध्ये बोलवण्यात येईल असे सांगून बस गाडी व बस चालकाला सोडण्यात आले.

आपल्या महितीकरिता.
बी आर सी अधिकारी

साधारण ठोकर
बसमार्ग क्रमांक : 185,सिरीयल क्रमांक : 34,बस गाडी क्रमांक : 7033, दिनांक 11/01/2025
आगार: घाटकोपर आगार(डागा ग्रुप मारुती SMTATPL) ,
घटनेचे ठिकाण: कन्नमवार नगर बस चौकी॰
बसचालक क्रमांक : 022064
बस वाहक क्रमांक : 199224. घटनेची वेळ-11.30,
जखमी पादचारी नाव ; लिफन चंद्ररडा राणा वय ; 20 वर्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here