Home मुंबई धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे* शालांत (१०वी) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना...

धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे* शालांत (१०वी) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षा संचाचे वाटप

163
0

*धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे* शालांत (१०वी) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दि ४ व ६ जानेवारी २०२५ रोजी परिक्षा संच  *Exam Kit* देण्यात आले.

 

दि ४ रोजीच्या  कार्यक्रमांतर्गत चिकित्सक समुहच्या सुमारे ९०विद्यार्थ्यांना *Exam Kit* चे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टतर्फे विश्वस्त सुरेश डोंगरे आणि डाॅ विभास मोडक  उपस्थित होते. चिकित्सक समूहाच्या शिलेदार बाई ,  आवटी व  पाटील सर उपस्थित होते. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी यांच्यासह गजानन केळकर उमेश थळे,  अनुष्का जोशी, बाळकृष्ण कुलकर्णी,  धोंडूभाऊ हांडे आणि अविनाश वेदपाठक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास हातभार लावला. ट्रस्टचे या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष असून आत्तापर्यंत या उपक्रमा अंतर्गत सुमारे ७०० विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे

 

६ जानेवारी  रोजी *एक्झाम किट* चे वाटप ट्रस्टच्या यशोमंगल सभागृहात झाले. सुमारे ७० विद्यार्थी विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला. आर्यन शाळेतर्फे  देशपांडे आणि  वारणकर सर ,शारदा सदन शाळेतर्फे शेळके मॅडम तसेच एस एल अँड एस एस हायस्कूल तर्फे मुख्याध्यापिका आजगावकर मॅडम उपस्थित होत्या. ट्रस्टतर्फे सुरेश डोंगरे आणि  उज्ज्वला मेहंदळे हे विश्वस्त उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले.  गजानन केळकर,  विनय गोरे,आशिष पळसुले देसाई आणि  बाळकृष्ण कुलकर्णीया ब्रह्मवृंदांच्या चमूने सर्वांना मंत्राशीर्वाद दिले.  उमेश थळे,  अनुष्का जोशी, गायत्री जोशी  धोंडीभाऊ हांडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास हातभार लावला. एक्झाम किट वाटपाचे हे सलग तिसरे वर्ष असून असेच कार्यक्रम *जनसेवा हीच जनार्दन सेवा* या उद्देशाने करण्याचा ट्रस्टचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले. *www.phadkeshreeganpati.org*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here