“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रमांतर्गत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुलुंड विभाग येथे शनिवार, दि ४ जानेवारी, २०२४ रोजी, लेखक शं. रा. पेंडसे (वय वर्षे ८८) यांच्या सगेसोयरे (श्रीसमर्थ प्रकाशन, पुणे) ९ व्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुलुंड विभागातील ग्रंथालय सेवक आणि सेविका सरोज शिरवडकर, संतोष पांगे, वीणा वारकर, हेमांगी भगत, आशा मायगडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
वाचनसंस्कृतील ,महत्वाचा दुवा असलेले ग्रंथसेवक आणि सेविका यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशन होणे हा अमृतयोग योगच आहे. आतापर्यंत असे ऐकिवात आले नाही. असे कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी सांगितले. लेखकाने आपल्या पुस्तकातील व पु काळे व अन्य महत्वाच्या व्यक्तींविषयी आठवणी सांगितल्या.
यावेळी उपस्थित वाचक वैशाली अभ्यंकर यांनी सगेसोयरे या ग्रंथातील मनोगताचे वाचन केले. तसेच सविता दांडेकर यांनी ग्रंथातील पु ल देशपांडे यांच्या विषयीचे वाचन केले. यावेळी उपस्थित काही वाचकांनी शं. रा. पेंडसे यांच्या ग्रंथाविषयी आपले विचार मांडले.त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका भाग्यश्री नूलकर यांनी केले. तसेच वाचकांशी संवाद देखील साधला. हा सोहळा खूपच प्रेरणादायी झाला.



















