Home राजकीय स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून...

स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध- उपसभापती डाॅ नीलम गोऱ्हे*

167
0

*स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन*

*माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध- उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे*

कोल्हापूर दि. ६ जानेवारी  : तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर शिवसेना पक्ष कार्यालयात करण्यात आले होते.

यावेळी अभिवादन करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “”माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा आज ममता दिवस आहे. शिवसेनेमध्ये सर्वांना मायेने आणि जिव्हाळ्याने सांभाळून घेण्याचे कार्य त्या करत होत्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना महिला आघाडीला मार्गदर्शन केले त्यामुळे अनेक उपक्रम आज चालू आहेत. विधानपरिषदेची उपसभापती आणि शिवसेना नेता या नात्याने आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, आज माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना आम्ही सर्वजण अभिवादन करत आहोत. या ठिकाणी स्थानिक आमदार आणि आपल्या राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आणि इथल्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलेले आहे. माँसाहेबांचे संस्कार तुम्ही जगात कुठेही असाल ते पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.”

याप्रसंगी शिवसेना महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी तसेच, इतर शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here