Home Uncategorized नाताळ (ख्रिसमस) निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय *बुधवार, दिनांक...

नाताळ (ख्रिसमस) निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय *बुधवार, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी राहणार खुले;

110
0

गुरुवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी राहणार बंद

नाताळ (ख्रिसमस) निमित्त बुधवार, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुटी आहे. असे असले तरी, बुधवार, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात येत आहे.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.

सबब, या ठरावानुसार बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी नाताळ (ख्रिसमस) निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here