Home पुणे “उमरेड-कऱ्हाड, जिल्हा नागपूर या अभयारण्य प्रकल्पात संपादन झालेल्या जमिनीची नुकसान भरपाई तत्काळ...

“उमरेड-कऱ्हाड, जिल्हा नागपूर या अभयारण्य प्रकल्पात संपादन झालेल्या जमिनीची नुकसान भरपाई तत्काळ द्यावी”, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

199
0

पुणे,

नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नवेगाव देशमुख जिल्हा नागपूर येथील शेतकरी कुटुंबांला भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाची तत्काळ दखल शिवसेना नेत्या तथा विधानपरिष उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली.

गोकुलदास डडमल, गुरूदास डडमल यांची नवेगाव (देशमुख ) जि.नागपूर येथे गट नं.७२ ,क्षेत्र २.११ हे. इतकी शेतजमीन आहे. डिसेंबर २०१२ मध्ये ही जमीन उमरेड-कऱ्हाड या प्रकल्पाकरिता वन्यजीव विभागाने भूसंपादन केली आहे. मात्र त्याचा मोबदला अद्यापही संबंधितांना देण्यात आलेला नाही. मोबदला मिळावा यासाठी गोकुलदास डडमल हे मागील अनेक वर्षापासून वन विभागाकडे पाठपुरावा करत आहेत.

वन खात्याच्या दिरंगाईमुळे त्यांनी नाईलाजाने २ डिसेंबर २०२४ पासून उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या उपोषणाची तत्काळ दखल घेऊन शासनाच्या वनविभागाच्या प्रधान सचिवांना संबंधितांना याचा मोबदला तातडीने देण्याची कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here