Home मुंबई संभाव्य मंत्री..दिल्लीत यादी पोहोचली? दिल्लीतून होणार यादी अंतिम? शपथविधी...

संभाव्य मंत्री..दिल्लीत यादी पोहोचली? दिल्लीतून होणार यादी अंतिम? शपथविधी आता १२ नाही तर १४ तारखेला – मुंबईत

1037
0

संभाव्य मंत्री..दिल्लीत यादी पोहोचली? दिल्लीतून होणार यादी अंतिम

शपथविधी आता १२ नाही तर १४ तारखेला – मुंबईत

अनेकांचे पत्ते कट… नव्या चेह-यांना संधी? दिल्लीकरांचा निर्णय अंतिम?

मंत्री पदाच्या  शक्यतेची यादी वायरल झालीय,यात जात, उत्तर भारतीय,राजस्थानी ,विभाग ,नव्यांना संधी   असे निकष दिसतात  ,मात्र यातही बदल होऊ शकतात.

भाजपाकडून २गुजराथी/ मारवाडी (सागर – संचेती), २ उत्तर भारतीय (उपाध्याय , दुबे) तसेच १च मतदारसंघातील २ (सागर , उपाध्याय)  दिले जाणार नाहीत.
स्नेहा दुबे या १ल्याच निवडून आल्या आहेत आणि भाजपतही आत्ताच आल्या आहेत, त्यामुळे त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता  नाही, हाच निकष श्रीजया चव्हाण यांनाही लागू  शकतो.

मात्र पक्षातील अंतर्गत स्पर्धेत काहीही होऊ शकते.

जेष्ठ, अनुभवी मंत्र्यांना यावेळी थांबायला सांगून नव्या चेहऱ्याना संधी द्यावी असा भाजपमध्ये सूर आहे. जुन्या मंत्र्यांत केवळ विखे पाटील यांना संधी मिळेल अशी शक्यता असली तरी ते  खात्रीने सांगता येणार नाही.

जर सुधीरभाऊ आणि चंद्रकांतदादा नसतील तर गिरीश महाजन देखील नसतील. पहिले दोघे प्रदेश अध्यक्षपदी होते, म्हणजे यावेळी महाजन यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होऊ शकते. अनुप अग्रवाल ही मंत्रिपदापेक्षा प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी जास्त उत्सुक आहेत.

पण महाराष्ट्रात कुणाचे वर्चस्व कुणाचे असावे यावर वेगळे गणित होऊ शकते.

तसेच आगामी मनपा निवडणूक हेही महत्वपूर्ण लक्ष्य  असेल.

पालघर जिल्ह्यात भाजप कोणाला मंत्रिपद देईल याची शक्यता नसली तरी कांग्रेस – भाजप -शिवसेना असा प्रवास करून आलेले सेनेचे आमदार राजेंद्र गावित यांना मंत्रिपद दिले जाण्याची  शक्यता आहे. गावित हे देवेंद्र फडणवीस यांच्या पसंतीचे  आहेत .   केंद्र आणि राज्य शासनासाठी वाढवण वाढवण बंदर हा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे. त्यासाठीच तिथे गावित यांना संधी तर त्यांच्या मदतीला पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांच्याकडे जबाबदारी दिली जाईल.

राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारत गोगावले यांची मंत्रिपदाची संधी पुन्हा हुकू शकेल.
सत्तार यांचे नाव नसेल अशी शक्यता असली तरी संजय शिरसाट यांनाही संधी मिळेलच अशी शक्यता नाही.

राष्ट्रवादी अजित पवार कडून  हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनाही नारळ दिला जाण्याची शक्यता आहे.

BJP* (संभाव्य मंत्री)
१. गिरीश महाजन
२. ⁠रविंद्र चव्हाण
३. ⁠चंद्रशेखर बावनकुळे
४. ⁠संजय उपाध्याय
५. ⁠योगेश सागर
६. ⁠देवयानी फरांदे
७. ⁠अनुप अग्रवाल
८. ⁠संजय कुटे
९. ⁠चैनसुख संचेती
१०. ⁠नितेश राणे
११. ⁠माधुरी मिसाळ
१२. ⁠गणेश नाईक
१३. ⁠शिवेंद्रराजे भोसले
१४. ⁠श्रीजया चव्हाण
१५. ⁠स्नेहा दुबे

*शिवसेना (संभाव्य मंत्री)*
१. उदय सामंत
२. ⁠तानाजी सावंत
३. ⁠शंभूराजे देसाई
४. ⁠दादा भुसे
५. ⁠गुलाबराव पाटील
६. ⁠राजेश क्षीरसागर
७. ⁠आशिष जैस्वाल
८. ⁠प्रताप सरनाईक
९. ⁠संजय शिरसाट
१०. ⁠भरत गोगावले

*NCP AP (संभाव्य मंत्री)*
१. आदिती तटकरे
२. ⁠हसन मुश्रीफ
३. ⁠छगन भुजबळ
४. ⁠धनंजय मुंडे
५. ⁠धर्मरावबाबा अत्राम
६. ⁠अनिल पाटील
७. ⁠दत्ता भरणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here