सस्नेह नमस्कार,
विविध शासकीय योजनांचा नागरिकांना थेट लाभ देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक ३ मार्च २०२४ रोजी प्रीमियर मैदान, कल्याण-शिळफाटा मार्ग, कोळे, कल्याण येथे दुपारी २.०० वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांचीही उपस्थिती असणार आहे.
योजनांच्या या महामेळाव्यासाठी आपण सर्वांनी जरूर यावे, जिल्हा प्रशासनाकडून आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
*आपले विनित,*
*जिल्हा प्रशासन,ठाणे*


















