Home मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, आतापर्यंत...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा, तर 11 महिलांना संधी

142
0

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

मुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने 67 उमेदवारांची घोषणा केली होती. आता, तिसऱ्या यादीतून 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबई येथील प्रदेश कार्यालय इथं पत्रकार परिषद घेत 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आतापर्यंत 76 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून 11 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील परिस्थिती आणि राज्यातील महिलांची असुरक्षित ही चव्हाट्यावर आली आहे. आमच्या लाडक्या बहीणी महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत, हे वारंवार सिद्ध झालं आहे. अशातच आज पहाटे वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी होऊन 9 जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती अत्यावस्थ आहे. वांद्रे टर्मिनसवर आज पहाटे झालेली गर्दी या सरकारला सांभाळता आलेली नाही आणि योग्य व्यवस्थापनही करता आलेलं नाही. कारण महाराष्ट्रातील आणि दिल्लीच्या सरकारचं लक्ष्य फक्त बुलेट सारख्या मोठ्या प्रकल्पावर आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

१. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माझलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here