Home उद्योग / शिक्षण वार्ता कल्याणात ॲड.निलम शिर्के – सामंत यांच्या उपस्थितीत दिव्यांग बालकलाकरांनी जल्लोषात सादर केला...

कल्याणात ॲड.निलम शिर्के – सामंत यांच्या उपस्थितीत दिव्यांग बालकलाकरांनी जल्लोषात सादर केला कलामहोत्सव.*

267
0

कल्याण :- बालरंगभूमी परिषद मध्यावर्तीच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के – सामंत यांच्या संकल्पनेतून दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव ” *यहाँ के हम सिकंदर* आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित,बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा संचलित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मध्यावर्तीच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के – सामंत,कार्याध्यक्ष राजू तुलालवार, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रविंद्र सावंत, उपाध्यक्ष अण्णा हांडूरे, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रामदास काळे या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या समयी कल्याण शाखेचे अध्यक्ष सतिश देसाई , प्रमुख कार्यवाह सुजाता कांबळे – डांगे,उपाध्यक्षा प्रिती बोरकर,कोषाध्यक्ष दिपक चिपळूणकर, सहकार्यवाह संजय गावडे व सुनिता देसाई योगेश कल्हापुरे व्यासपीठावर उपस्थित होते. तर कार्यकारिणी सदस्य विशाल पितळे, सौरभ रमेश आरोटे, मीनल ठाकोर, सुरेखा गावंडे, मेघा शृंगारपुरे, चेतन दुर्वे, भूषण मेहेर, दिपाली पितळे, श्रीीती मेहेर कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्याध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले व अध्यक्षा ॲड.निलम शिर्के – सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांग बालकलावांतांचे भरभरून कौतुक करून कलाकारांना प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व महोत्सवाचे भव्यदिव्य देखणे आयोजन बघून कल्याण बालरंगभूमी परिषदेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
या कलामहोत्सवामध्ये १४ दिव्यांग शाळेतील दोनशे कलाकारांनी सहभाग घेतला होता.दिव्यांग बालकलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सदरीकरणांनी सर्व रसिक प्रेक्षक भारावून गेले आणि रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्तम प्रतिसाद दिला. व कल्याण शाखेला उत्तम नियोजन करून कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र सावंत, जेष्ठ नाट्यदिग्दर्षक रामदास काळे, अण्णा हांडोरे, हेमंत यादगिरे उपस्थित होते.बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा कार्याध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे अत्रे रंगमंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
विकास सोनवणे आणि सुजाता कांबळे – डांगे यांनी संपूर्ण कलामहोत्सवाचे निवेदन केले.

*प्रदर्शनातील दिवाळी व रोजच्यासाठी उपयोगी वस्तू*

उपलब्धतेसाठी
संपर्क:
+91 98193 05191
*विशाल अशोक पितळे*
कार्यकारिणी सदस्य व सोशल मीडिया समिती
बाल रंगभूमी परिषद कल्याण शाखा

*कर्णबधिर विकास विद्यालय, किन्हवली, तालुका.शहापूर*
*रत्नाकर सोनवणे सर*
*संपर्क-9270091113*
दिवाळी पणत्या,तोरण, शोभिवंत माळा ;ज्वेलरी(नथ,बुगडी, गळ्यातील हार व इतर)

*संवाद कर्णबधिर प्रबोधिनी डोंबिवली (प)* दिवाळीसाठी भेटवस्तू, शोभेच्या वस्तू, पणत्या, फ्रिज मग्नेट (श्लोक), लीपण दिवे, लक्ष्मीची पावलं, खण सरस्वती , इतर वस्तू.

*सदिच्छा मतिमंद विद्यालय कल्याण*
*दिवाळी पणत्या ,फुलांची तोरणे , उटणी पॉकेट ,प्रेझेंट पॉकेट , आकाश कंदील , मण्याची माळ , कापडी फुल व इतर वस्तू
मोहन पवार : ९८१९८२२४४६

*विकास मतिमंद विद्यालय उल्हासनगर*
दिवाळी पणती ,पेपर बॅग,मेणबत्ती ,पायपुसणी ,कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या टोपल्या,कागदी फुले

*Marthoma special school*
रांगोळी, उटने,झेंडूच्या माळा ,तोरण
सुप्रिया अजित गांगुर्डे

*साईबाबा मतिमंद मुलांची शाळा उल्हासनगर* –
वस्तूंची यादी.
फाईल्स,दिवाळी पणत्या ;साडी पेटीकोट ,पिलो कव्हर,राखी , पेपर प्लेट् फिनाईल
इतर वस्तू ठेवण्यात आल्या.
सुनिता प्रीतीश जोगळेकर.
प्रज्ञा करुणा मूकबधिर विद्यालय उल्हासनगर 4
अनिता अय्यर
संपर्क क्रमांक -9421573295
फुलांच्या माळा ,पणत्या ,लोकरीचे तोरण,आकाश कंदील ,रंगीत छोटे मटके ,उशी कव्हर
,लोकरीचे रुमाल ,वर्तमानपत्रा पासून बनवलेले पेपर पॉट ,पायदान ,मंडाला आर्ट फोटो फ्रेम ,लोकरीच्या पिशव्या ,लोकरीचे फुलं ,अगरबत्ती
ज्वेलरी -चोकर,पाच पदरी माळा ,तन्मणी माळा ,हेअर ब्रोच ,नथ ,केसातील गुलाब फूल,गजरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here