Home मुख्य बातम्या शेतकरी विरोधी,फसव्या, खोटारड्या, सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार

शेतकरी विरोधी,फसव्या, खोटारड्या, सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार

161
0

*शेतकरी विरोधी,फसव्या, खोटारड्या* *सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार*

*सरकारकडून गुंडांच उदात्तीकरण
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप*
मुंबई – युती सरकार हे जनतेसाठी फसव्या घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील आहे. या सरकारमध्ये मोठया प्रमाणात गुंडांचा हैदोस सुरू असून सरकारकडून या गुंडांचा उदात्तीकरण होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी शेतकरी विरोधी,फसव्या, खोटारड्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

उत्तर प्रदेश राज्यात पोलीस भरती परिक्षेचा पेपर फुटल्यावर परीक्षा रद्द केली गेली मात्र आपल्याकडे परीक्षेसाठी गँग काम करते. परीक्षार्थी हुशार व प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

गेल्या वेळी अतिवृष्टी झाल्यावर सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती मात्र अद्याप ते अनुदानही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. रुग्णवाहिका टेंडर प्रक्रियेतही मोठया प्रमाणात घोटाळा झाला आहे. सरकारने १ रुपयांत पीक विम्याची घोषणा केली मात्र यात कंपन्यांच भल झालं, सरकार पीक विम्या कंपन्यांच एजंट असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

शासन आपल्या दारी न जाता जनतेलाच शासनाच्या दारोदारी चकरा माराव्या लागत असल्याची टीका दानवे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावर केली.

सरकारने महानंद डेअरी गुजरातच्या हवाली केली. आरे डेअरी, रेसकोर्स आदी प्रश्नांवर या अंतिरीम अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचे दानवे म्हणाले.

राज्यात गुंडा राज सुरू असून काही गुंडांना त्यांच्या पश्चात सत्ताधारी आमदार हिंदू डॉन उपमा देतात. गुंड राजरोसपणे वर्षा बंगल्यावर मंत्रालयात जातात.

या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली असून सरकारच आयात निर्यात धोरण हे शेतकरी विरोधी आहे. सरकारने कापूस खरेदी केंद्र सुरू केलं नाही. शेतकऱ्यांच्या धोरणात व्यापारीच लयलूट करत असल्याचे दानवे म्हणाले.
यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी, शेकापचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते भाई जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here