Home संभाजीनगर अग्रदूत लोककलावंतांचा  मेळावा संभाजीनगर मध्ये

अग्रदूत लोककलावंतांचा  मेळावा संभाजीनगर मध्ये

212
0

 अग्रदूत लोककलावंतांचा  मेळावा संभाजीनगर मध्ये

उद्या दिनांक 5 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी तर्फे संभाजीनगर येथे प्रथमच लोक कलावंत आणि लोक गायक यांचा मेळावा दुपारी एक ते संध्याकाळी सहा पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण राज्यमंत्री अतुल सावे, पूर्व केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि इतर नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमांमध्ये  वेगवेगळ्या लोककलेचे  11 लोकप्रिय वयोवृद्ध कलाकारांना ( शाहीर कीर्तन हलगी वादन, वाघ्या मुरळी इत्यादी) सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमांच्या पाहुण्यांमध्ये निर्माता निर्देशक लेखक एन चंद्रा अभिनेत्री किशोरी शहाणे,  विजय पाटकर( वरिष्ठ उपाध्यक्ष चित्रपट आघाडी ) सुरभी हांडे, गायक संगीतकार अजित परब इत्यादी कलाकार पण उपस्थित राहणार आहे. याविषयी बोलताना कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे म्हणाले की या मेळाव्याचा मुख्य उद्देश सरकार आणि लोक कलावंतांमध्ये एक दुवा निर्माण करणे. सरकारचे अनुदान आणि योजनांचा फायदा तळागाळातील गरीब लोक कलाकारांना मिळवून देणे, आणि कलाकारांचा एक डाटा बनवणे असा आहे. भाजपा चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित म्हणाले की चित्रपट आघाडी ने गेल्या सहा महिन्यात  सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातल्या बऱ्याच प्रश्नांना हाताळले असून तंबू मालकांचे प्रश्न सिने पत्रकारांचे प्रश्न, सिने  लेखकांचे प्रश्न इत्यादी प्रश्नांना मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये अनेक प्रश्नांचे निराकरण पण झाले आहे. या कार्यक्रमात चित्रपट आघाडीचे सरचिटणीस  राकेश भोसले, शिरीष राणे, चंद्रकांत विसपुते आणि उपाध्यक्ष सचिन अनर्थे ( उपाध्यक्ष ) उपस्थित राहणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here