कांदिवली
अनिल चासकर
अंधेरी येथील एम आय डी सी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने बनावट एम्लॉयमेंट अधिकाऱ्याला अटक केली.
परदेशात नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या बेरोजगार तरूणांची फसवणूक करून त्यांच्या कडून पैसे घेऊन दिशाभूल करणाऱ्या क्रिष्णा कमलाकांत त्रिपाठी,( ५२ ), यास अटक करून,पोलीस कोठाडीत असलेल्या त्रिपाठी ची पोलीस कसून तपासणी करत आहेत.
अंधेरी पूर्व, बिजनेस बे पश्चिम दृतगती मेट्रो स्टेशनं येथील 9 व्या मजल्यावर ऑफिस क्रं 925 मध्ये, ई एक्सीस एमीग्रेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चे कार्यालय आहे.या बनावट ऑफिस मध्ये लोकांना परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली जाते. नोकरीसाठी बनावट वर्क परमिट लेटर देण्यात येत होते. तसेच कामात दिरंगाई, नोकरी नं मिळाल्याने, तक्रार वा दिलेली रक्कम परत मागणाऱ्या बेरोजगार तरुणांना रक्कम परत न देता त्यांची फसवणूक करीत होते.
एका फसवणूक झालेल्या बेरोजगार तरुणाने या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली.गुन्हा नोंद झाल्यानंतर
सदर माहितीची सत्यता कक्ष ८ ने पडताळली आणि दिनांक ३० ऑगस्ट रोजी, एम्लॉयमेंट अधिकारी
कृष्णा कमलाकांत त्रिपाठी यास अटक केली.
न्यायालयासमक्ष रिमांड साठी हजर केले असता दिनांक ०३/९/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ८ चे पथकाने नमूद बनावट ऑफिस येथे छापा टाकून व्होडाफोन चे ४५ व जिओ चे १० सिमकार्डस, ०८ लॅपटॉपस, ०१ डेस्कटॉप, ०२ मोबाईल फोनस, ०२ बनावट स्टॅम्प, रोख रक्कम १,२२,०००/-रु., व्हिजीटिंग कार्डस व इतर कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे.
कक्ष-८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोनि श्रीकांत इंगवले, सपोनि मनोजकुमार प्रजापती, सपोनि मधुकर धुतराज, सपोनि संग्राम पाटील, सपोनि राहुल प्रभु, पोउनि अरविंद मोरे, पोउनि विकास मोरे, सपोउपनि शिरसाट यानी कामगिरी पार पाडली.




















