Home Trending Now शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांची बदलापूर घटनेवर प्रतिक्रिया

शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांची बदलापूर घटनेवर प्रतिक्रिया

126
0

बदलापूर

बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद, क्लेशकारक आणि संतापजनक आहे. या घटनेनंतर बदलापूरमध्ये प्रचंड नागरिक उद्रेक झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी ही केस फासस्ट्रॅकवर चालवण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी बदलापुरात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणी संबधित शाळेचे प्रशासन, शिक्षक, आरोपी असो किंवा ज्या पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली, अशा सगळ्यांना क्षमा केली जाणार नाही. या घटनेचे कोणी राजकारण करु नये, कारण यातील पिडीत दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी एक स्त्री म्हणून मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here