Home Trending Now दलितमित्र राजा जाधव यांच्या ‘दादर ते दादर’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन

दलितमित्र राजा जाधव यांच्या ‘दादर ते दादर’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन

140
0

दादर

दलितमित्र राजा जाधव यांच्या *दादर ते दादर* या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शनिवारी १७ ऑगस्टला पार पडले. निको हॉल, वडाळा येथे, आमदार कालिदास कोळंबकर आणि प्रसिद्ध बालरोग तज्ञ, लोकमान्य टिळक सायन रुग्णालयाच्या माजी अधिष्ठात्री आणि बालरोग विभागप्रमुख डॉ. माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ग्रंथाली तर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे लेखन दादासाहेब दापोलीकर यांनी केले आहे.‌ राजाभाऊ जाधव यांनी वसई, नालासोपारा परिसरात केलेल्या समाजसेवेचा अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

प्रतिथयश लेखक सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी पुस्तकाच्या चरित्र नायकाच्या आयुष्यातील काही उल्लेखनीय घटनांचा आढावा घेतला. ‘राजाभाऊ हे कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्व यांचा जणू त्रिवेणी संगमच आहेत,’ असे ते म्हणाले.
दादासाहेब दापोलीकरांनी या पुस्तक निर्मितीमागील भूमिका विशद केली. ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर यांनी ग्रंथालीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here