Home Trending Now दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान, रूपाली चाकणकर यांनी...

दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान, रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली खंत

144
0

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी समाज कल्याण आणि राज्य सेवा परीक्षा या दोन परीक्षा आयबीपीएसकडून होणाऱ्या बँकिग/ क्लर्क परीक्षेच्या दिवशीच अनुक्रमे १८ आणि २५ऑगस्टला होत आहेत. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने याचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी पत्रकातून एमपीएससी विभागाकडे विनंती पत्र पाठवले आहे. राज्यभरातून विद्यार्थी याबाबत मला संपर्क करत आहेत. आपल्या राज्यातील मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून या विषयाची गांभीर्याने दखल घेत मी राज्य लोकसेवा आयोगाकडून होणारी परीक्षा तातडीने पुढे ढकलावी अशी विनंती एमपीएसी अध्यक्षांकडे केले असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

IBPS RRB Clerk व MPSC या एकाच दिवशी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ मधील कलम १० (1) (जे) नुसार स्त्रियांना सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणेस सक्रिय करणे हा आयोगाच्या स्थापनेमागचा उद्देश आहे.महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ मधील कलम १० (१) (जे) नुसार स्त्रियांना सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणेस सक्रिय करणे हा आयोगाच्या स्थापने मागचा उद्देश आहे. IBPS RRB Clerk व MPSC समाज कल्याण परीक्षा एकाच दिवशी म्हणजे दि.१८ ऑगस्ट, २०२४ रोजी तसेच नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) २०२४ व IBPS Clerk परीक्षा एकाच दिवशी म्हणजे दि.२५ ऑगस्ट, २०२४ रोजी होणार असून दोन्ही फॉर्म भरलेल्या एकाच दिवशी दोन परीक्षा झाल्यास कोणत्यातरी एका परीक्षेला वंचित रहावे लागणार आहे. तरी याबाबत मला राज्यभरातून विद्यार्थी, विद्यार्थीनीं संपर्क करुन विनंती करीत आहेत. तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जर या परीक्षेचे वेळापत्रकात अंशतः बदल केल्यास राज्यातील सर्व विद्याथ्यर्थ्यांना सदर परीक्षेस बसण्याची संधी मिळेल. यास्तव आपणास विनंती करण्यात येते की, आपण विद्याथ्यांच्या भविष्याचा गांभींयाने सकारात्मक विचार करावा जेणे करुन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here