Home दिल्ली *नवीकरणीय ऊर्जेत महाराष्ट्राचा देशात डंका; राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान*

*नवीकरणीय ऊर्जेत महाराष्ट्राचा देशात डंका; राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान*

9
0

*नवीकरणीय ऊर्जेत महाराष्ट्राचा देशात डंका; राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान*

नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर — नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्वसाधारण श्रेणीत गुजरातनंतर महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

भारत मंडपम येथे ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६’च्या समारोपप्रसंगी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. शेजारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्रालयाने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने हा मूल्यांकन आराखडा तयार केला आहे. नवीकरणीय क्षमता, धोरण, ग्रिड सज्जता, वितरण कंपन्यांची कामगिरी आणि गुंतवणुकीचे वातावरण या निकषांवर मूल्यांकन झाले.

*महाराष्ट्र पॅव्हेलियन गाजले —* २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र पार्टनर स्टेट होता. गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित दालनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्हर्च्युअल रिअॅलिटी झोनमध्ये घाटघर जलविद्युत आणि सिन्नर सौर प्रकल्पाची आभासी सफर, सौर कृषिवाहिनी २.० आणि मागेल त्याला सौर पंप योजनेची माहिती.

*फोटो ओळ:*
नवी दिल्ली | भारत मंडपम येथे ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६’च्या समारोपप्रसंगी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्राला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव आभा शुक्ला. शेजारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी.

*मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया:* “हा पुरस्कार अभिमानाची बाब आहे. स्वच्छ ऊर्जा वापर वाढवण्यास बळ मिळेल” — देवेंद्र फडणवीस.

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here