Home मुंबई *८६ हजार वीज कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर*

*८६ हजार वीज कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर*

9
0

*८६ हजार वीज कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर*

मुंबई : राज्यातील ८६ हजार वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

वर्कर्स फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २५ हजार बोनसची मागणी केली होती. १८ संघटनांच्या कृती समितीनेही यासाठी पत्र दिले होते.

महावितरणला १२३४.१६ कोटी, महानिर्मितीला ४५१.९८ कोटी आणि महापारेषणला २४३८ कोटी नफा झाला आहे. सोलर कृषी पंप योजनेसाठी वर्ल्ड रेकॉर्डही मिळाला आहे.

व्यवस्थापनाचा प्रस्ताव अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे गेला. चर्चेनंतर २० हजार बोनसला मान्यता मिळाली.

अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांना २० हजार, तर विद्युत सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक यांना १४ हजार रुपये मिळणार आहेत.

माहिती फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा आणि सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here