रत्नागिरीत उद्योजकता, संस्कृती आणि उत्सवाचा संगम: ‘दिवाळी शॉपिंग फेस्ट २०२६’!
रत्नागिरी शहरात स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रत्नागिरी खबरदार’च्या वतीने आयोजित ‘दिवाळी शॉपिंग फेस्ट २०२६’ चे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. या दिवाळी शॉपिंग फेस्ट चे हे ९ वे वर्ष आहे.
यावेळी आमदार किरण (भैय्या) सामंत, डॉ. आनंद पेडणेकर (संचालक, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर) सुमित ओसवाल (अध्यक्ष, लायन्स क्लब) अमेय वीरकर, ओमकार रहाटे, हेमंत वणजू, दिपक पवार सौरभ मलुष्टे हे मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवामध्ये आपल्या कोकणातील उद्योग व गुंतवणुकीला चालना मिळण्यासोबतच स्थानिक मराठी व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या शॉपिंग फेस्टमध्ये तब्बल ६५ मान्यवर व उद्योजक सहभागी झाले आहेत, जे रत्नागिरीच्या व्यापारी समृद्धीची साक्ष देतात!
स्थानिक उद्योग, व्यापार, गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि आपल्या मराठी भाषेचा व संस्कृतीचा गौरव जपण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना शासन आणि पालकमंत्री म्हणून माझे नेहमीच खंबीर समर्थन आहे.
चला, या दिवाळीत आपल्या हक्काच्या स्थानिक उत्पादनांची खरेदी करून रत्नागिरीच्या अर्थकारणाला बळ देऊया आणि या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवूया!
किरण (भैय्या) सामंत
Jagannath Gangaram Pednekar Jewellers
#Ratnagiri #DiwaliShoppingFest2026 #KonkanBusiness #LocalBusiness #MadeInMaharashtra DiwaliFestival MarathiCulture Entrepreneurship LocalProducts

























