Home मुंबई *मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या* *पदाधिकाऱ्यांचा आज दादरमध्ये जाहीर मेळावा*

*मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या* *पदाधिकाऱ्यांचा आज दादरमध्ये जाहीर मेळावा*

24
0

*मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या*

*पदाधिकाऱ्यांचा आज दादरमध्ये जाहीर मेळावा*

मुंबई – सहकार पॅनेलतर्फे मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा उद्या रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर भूषविणार आहेत.

दादर (पूर्व) येथील स्वामी नारायण मंदिरासमोरील कोहिनुर मंगल कार्यालयात पार पडणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या या जाहीर मेळाव्याला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, विधानपरिषद आमदार व संचालक प्रसाद लाड, आमदार व संचालक सुनिल राऊत, संचालक नंदकुमार काटकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्याला मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here