Home मुंबई *मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत एकाच व्यक्तीकडून २४ अर्ज दाखल...

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत एकाच व्यक्तीकडून २४ अर्ज दाखल केल्याप्रकरणी धारावी पोलिसांत गुन्हा दाखल*

23
0

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत एकाच व्यक्तीकडून २४ अर्ज दाखल केल्याप्रकरणी धारावी पोलिसांत गुन्हा दाखल*

*•१७८-धारावी विधानसभा मतदारसंघातील प्रकार*

माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने, प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकतीसाठी एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात धारावी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम (SIR) -२०२६ अंतर्गत दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२६ ते २६ ऑक्टोबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.

माननीय भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, नमुना ७ चे जास्तीत जास्त १० अर्ज प्रतिदिन दाखल करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नमुना ७ मध्ये जाणूनबुजून चुकीची माहिती किंवा घोषणा केल्याचे आढळल्यास संबंधित हरकतदाराविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये कार्यवाही करण्याची तरतूद आहे.

तथापि, १७८-धारावी विधानसभा मतदारसंघामध्ये गिरिधारी स्वामीनाथ जयस्वाल (रा.गंगाधरलाल चाळ, ९० फूट मार्ग, धारावी पूर्व) यांनी एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निर्धारित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार, नियमांचे उल्लंघन करून खोटी व चुकीची माहिती देत नमुना ७ चे अर्ज दाखल केल्याप्रकरणी गिरिधारी स्वामीनाथ जयस्वालविरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here