Home मुंबई काँग्रेसच्या सततच्या आंदोलनामुळे अखेर सायन पुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला, व्हर्च्युअल उद्घाटनच करायचे...

काँग्रेसच्या सततच्या आंदोलनामुळे अखेर सायन पुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला, व्हर्च्युअल उद्घाटनच करायचे होते तर एवढा उशिर का केला ? खा. वर्षा गायकवाड

27
0

काँग्रेसच्या सततच्या आंदोलनामुळे अखेर सायन पुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला, व्हर्च्युअल उद्घाटनच करायचे होते तर एवढा उशिर का केला ? खा. वर्षा गायकवाड

सायन पुलाच्या उद्घाटनासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आंदोलन..

मुंबई, दि. २१ ऑक्टोबर ..

सायन पुल बांधून तयार असतानाही तो केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ नाही म्हणून त्याचे उद्घाटन केले जात नव्हते. काँग्रेस पक्षाने यासाठी सातत्याने आंदोलन करून पुल खुला करावा अशी मागणी केली होती पण तारिख पे तारिख देत महायुती सरकार त्याकडे दुर्लक्ष करत होते. शेवटी काँग्रेसच्या आंदोलनामुळे भाजपा महायुती सरकारला जाग आली व आता गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी या पुलाचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्याचा मुहूर्त सरकारला सापडला, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी सायन पुल खुला करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार डॉ. ज्योती गायकवाड, काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सायन पुलाचे व्हर्च्युअल उद्घाटन गुरुवारी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे पण व्हर्च्युअल उद्घाटनच करायचे होते तर इतके दिवस हा पुला खुला करण्यासाठी वेळ का घेतला. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो खुला करता आला असता. या कालावधीत मुंबईकरांचे या भागातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे, ज्येष्ठ नागरिकांचे अत्यंत हाल झाले, त्याची जबाबदारी कोण घेणार. सायन पुल खुला करावा यासाठी मुंबई काँग्रेसने वेळोवेळी आंदोलन केले पण सरकारला मुंबईकरांचे काही पडलेले नाही. महायुती सरकार व महानगरपालिकेला फक्त टक्केवारीत जास्त रस आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here