*भाजपा मुंबईच्या अध्यक्षांच्या मातोश्री शीतल भास्कर साटम यांचे दुःखद निधन*
*मुंबई, दि. ११ ऑक्टोबर २०२६ :* भारतीय जनता पार्टी, मुंबईचे अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांच्या मातोश्री शीतल भास्कर साटम यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने साटम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, भाजपा परिवारात शोककळा पसरली आहे.
श्रीमती शीतल भास्कर साटम यांची अंत्ययात्रा आज, रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. त्यांच्यावर विलेपार्ले सेवा समाज स्मशानभूमी, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
*अंत्ययात्रेचा पत्ता :*
यशोधन सोसायटी, बी विंग, इर्ला ब्रिज, एस. व्ही. रोड, अंधेरी अग्निशमन केंद्रासमोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई.
*अंत्यसंस्काराचे स्थळ :*
विलेपार्ले सेवा समाज स्मशानभूमी, एस. व्ही. रोड, पवन हंसजवळ, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई.
शीतल भास्कर साटम यांना भाजपा मुंबई परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, साटम कुटुंबीयांच्या दुःखात भाजपा मुंबई परिवार सहभागी आहे.
*श्वेता परूळकर*
सरचिटणीस, भाजपा मुंबई





















