Home मुंबई *मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) मार्गरेषेमुळे बाधित होणा-या बोरिवलीतील ३० बांधकामांचे निष्‍कासन*

*मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) मार्गरेषेमुळे बाधित होणा-या बोरिवलीतील ३० बांधकामांचे निष्‍कासन*

36
0

*मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) मार्गरेषेमुळे बाधित होणा-या बोरिवलीतील ३० बांधकामांचे निष्‍कासन*

*आर उत्‍तर विभागाची कारवाई*

मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) मार्गरेषेमुळे बाधित होणा-या बोरिवली येथील जोडरस्‍त्‍याच्‍या पश्चिम बाजूकडील ३० बांधकामांचे आज (दिनांक ९ ऑक्‍टोबर २०२६) आर उत्‍तर विभागाच्‍यावतीने निष्‍कासन करण्‍यात आले. 

मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्‍यासाठी व सुगम, अखंड प्रवासाच्या उद्देशाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनार पट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम विविध सात टप्प्यांमध्ये (Package) विभागण्यात आले आहे.पॅकेज एफ मध्‍ये ३.४७ लांबीच्‍या गोराई आंतरबदल ते दहिसर आंतरबदल (Interchange) (उन्‍नत मार्ग) विकास कामाचा अंतर्भाव आहे.

मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) मार्गरेषेमुळे बोरिवली येथील जोडरस्‍त्‍याच्‍या पश्चिम बाजूकडील (Borivali Connector) ३० बांधकामे बाधित होत आहेत. उप आयुक्‍त (परिमंडळ – ७) यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्‍त (आर उत्‍तर) यांच्‍या नेतृत्‍वाखाली आर उत्‍तर विभागाच्‍यावतीने या बांधकामांचे आज निष्‍कासन करण्‍यात आले. महानगरपालिकेचे ५ अभियंते, २० कर्मचारी यांच्या सोबत २ पोकलेन संयंत्र, २ जेसीबी संयंत्र, ३ डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. महाराष्‍ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी पोलीस ठाण्‍याचे  कर्मचारी यावेळी तैनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here