Home Trending Now नाटक ते बॉलिवूड – नाना पाटेकर यांच्या अजरामर भूमिका – एक सोनेरी...

नाटक ते बॉलिवूड – नाना पाटेकर यांच्या अजरामर भूमिका – एक सोनेरी प्रवास संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर

110
0

नाटक ते बॉलिवूड – नाना पाटेकर यांच्या अजरामर भूमिका – एक सोनेरी प्रवास
संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | ९ ऑक्टोबर २०२६

नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे, ज्यांनी आपल्या आक्रमक संवादफेक, अफाट ऊर्जा आणि वास्तववादी अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी आणि अढळ ओळख निर्माण केली. त्यांचे अभिनय कौशल्य व्यावसायिक सिनेमांपासून ते समांतर सिनेमांपर्यंत आणि प्रायोगिक नाटकांपर्यंत सारख्याच ताकदीने विस्तारलेले आहे.
लिहिण्यासारखं खूप असतं पण मोजकं आणि भेदक लिहिणं महत्त्वपूर्ण!
नाना पाटेकर ..भंडारी माणसांचा तोच बाणा, मिजास पण त्यात माज नसतो. परिस्थितीशरणता नसते. हे सगळं मी माझा नवरा रंगकर्मी हरीष रामचंद्रबुवा करदेकर यांच्या मुळे अनुभवलं. या क्षेत्राची ओळख ही त्याच्या मुळेच झाली.
हरीषचं मुळ गाव मुरुड जंजिरा, भंडारवाड्यात मोठं घर त्यामागचं घर नानांच्या मामांचं घर!
ही आठवण हरीष सांगायचा.
बाॅलीवूड मधे स्वतःचा रुबाब व दरारा साधेपणाने कायम ठेवणारा कलावंत म्हणजे नाना पाटेकर…
मी जेव्हा हरीषचं चौथी घंटा हे पुस्तक करणाल आहे तेव्हा पडद्यामागच्या रंगमंचावरील कोणीही न सांगितलेल्या आठवणी आणि घटनांचा पेटारा उघडणार आहे… तर नावांबद्दल खूप लिहिलं गेलं खूप काही सुटलंही ..पण संपादक म्हणून थोडी उजळणी!

प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी –
नानांची नाटकातील सुरुवात*
नानांच्या अभिनयाचा पाया मराठी रंगभूमीवर रचला गेला. भालबा केळकर यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ मधून त्यांनी धडे गिरवले.
– *हमीदाबाईची कोठी – सत्तार भाई:* पक्का मुंबईया, तिखट पण मनाचा साफ, पाशवी आणि हळवा माणूस – रसिकांना खिळवून ठेवणारी भूमिका केली.
नाटकच भन्नाट होतं. हे नाटक माऊली प्रोडक्शन चे निर्माते उदय धुरत यांनी रंगमंचावर आणलं. यात प्रमुख भूमिका दिग्दर्शन विजया मेहतंचे होते. बाईंची सत्तारच्या भूमिकेसाठी १ली पसंत नाना पाटेकर नव्हते. अरविंद देशपांडे यांनी नाना पाटेकरचे नाव उदय धुरत यांना सूचवले.
आणि व्यावसायिक रंगमंचावर दमदार क्लासिक नाटकात नाना पाटेकर यांनी पदार्पण केले आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही.
या नाटकानेच चित्रपटातून नानांचा कामाची ऑफर आली..असं धुरत सांगतात.
*पुरुष नातकातला गुलाबराव: जयवंत दळवी लिखित – अत्यंत क्रूर, सत्तांध, खलनायकी प्रवृत्तीची ही भूमिका.आवाज आणि अभिनय यांचे उत्तम उदाहरण पुरुष नाटक होते.- महाराष्ट्राला त्यांच्या अभिनयाची धार दाखवणारी ही भूमिका ठरली.

. बॉलिवूडमधील पदार्पण*
१९७८ मध्ये ‘गमन’ मधून पदार्पण. ‘मोहरे’ (१९८७) आणि ‘सलाम बॉम्बे’ (१९८८) मधील ‘बाबा’ – नैसर्गिक अभिनयाची साक्ष देणारे होते.

सुवर्णकाळ – मैलाचे दगड ठरलेल्या ७ भूमिका*

परिंदा (१९८९) – अण्णा सेठ:* मानसिकदृष्ट्या अस्थिर, आगीची भीती वाटणारा क्रूर डॉन – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून – राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

क्रांतीवीर (१९९४) – प्रताप:* कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू. “आ गये मेरी मौत का तमाशा देखने…” हा भारतीय सिनेमाच्या इतिहासात अमर झालेला संवाद – सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नानांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

अग्निसाक्षी (१९९६) – विश्वनाथ:* संशयी, पत्नीवर अत्याचार करणारा क्रूर पती – डोळ्यातील हिंस्रपणा तर भेदक यासाठी तिसरा राष्ट्रीय पुरस्कार नानांना मिळाला

खामोशी (१९९६) – जोसेफ:* मूकबधिर बाप – एक शब्द न बोलता फक्त डोळे आणि हावभावातून वेदना दाखवणारी ही भूमिका अष्टपैलूत्वाचा नमुना होती

अब तक छप्पन (२००४) – साधू आगाशे:* शांत एन्काऊंटर स्पेशलिस्ट – ओरड नाही, फक्त वास्तववादी गेम

वेलकम (२००७) – उदय शेट्टी:* गंभीर भूमिकेचा समज मोडला – “कंट्रोल उदय…” – मजनू भाई सोबतची जुगलबंदी – कॉमिक टायमिंगचा कळस असणारा चित्रपट

नटसम्राट (२०१६) – गणपतराव बेलवलकर:* अभिनयाचा कळस – वृद्ध नटाची शोकांतिका – प्रत्येक डोळा पाणावणारा हा मास्टरपीस होता.
डाॅ लागूंनी याञभूमिकेवर आपली मोहोर उठवली होती.
पण नानांनी यात आपली अशी मोहोर उमटवली.

*४. अभिनयाची ४ प्रमुख वैशिष्ट्ये*
*संवादफेक:* अचूक पॉज, आवाजाची पट्टी अचानक बदलणे. *नैसर्गिक शैली:* पात्रात एकरूप – अभिनय नाही तर जगणं.
– *डोळ्यांचा वापर:* राग असो वा हळवेपण – निम्मा अभिनय डोळेच करतात.
*अष्टपैलूत्व:* हिंस्र खलनायक ते हळवा बाप – सगळं सारख्याच ताकदीने मांडण्याची कसब.
एक कुवारा शादी शुदा या हिंदी नाटकाचे दिल्लीत दमदार प्रयोग झाले.

*निष्कर्ष:*
नाटकातून सुरू झालेला नाना पाटेकर यांचा प्रवास बॉलिवूडचा सोनेरी इतिहास बनला आहे.
निसर्गाची ओढ, लोकाना मदत करण्याची नैसर्गिक आस..स्टार डम न जोपासता अघळपघळ वावरणारा हा रंगकर्मी. अभ्यासून प्रहारसारखा सिनेमा तयार करतो .
नाम संस्थेतून शेतकऱ्यांना, गरीब शेतकरी महिलांना मदत करतो.
राजकीय नेत्यात वावरतानाही तसाच मोकळा बाणा( कुणाला पंसंत पडो न पडो )
आपण जेवण करुन इतरांना खाऊ घालण्याची आवड .
नीलाकांती आणि नाना यांचं नातं जगापलीकडचं…आपलं स्वातंत्र्य राखून कायदेशीर विभक्त न होता ३५ वर्ष वेगळ रहाणं. हे कसं काय याचा विचार आपण करु शकत नाही.हा त्यांचा खाजगी विषय. दोघेही अवलिया एकत्र आले आणि खूपसं वेगळं घडलं..इतकच म्हणू शकतो.
तर नानांमधे अनेक दोष असतील पण कलाकार म्हणून ते प्रभावी होतेच आणि इतिहासात ही तीच नोंद होईल.
त्यांनी कधीही स्टारडमच्या मागे न धावता केवळ ‘अभिनेता’ म्हणून स्वतःला सिद्ध केले. म्हणूनच नाना पाटेकर हे कधीही न विझणारे वादळ आहे.

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here