*गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा आता रील्स आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून जगभर पोहोचणार!*
शिवसेना युवा सेना, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय गणेशोत्सव रील बाज व फोटोग्राफी स्पर्धा २०२६’ चा बक्षीस वितरण समारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना ना. उदय सामंत ह्यांनी या उपक्रमातून रत्नागिरीच्या गणेशोत्सवाचे सांस्कृतिक वैभव आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जपण्याचा आणि जगासमोर मांडण्याचा सुंदर प्रयत्न झाला आहे. या स्पर्धेचे संकल्पक अथर्व राजन साळवी आणि रत्नागिरी सिंडिकेट फोटोग्राफर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले. या स्पर्धा फोटोग्राफी, सिनेमॅटिक रील आणि मोबाईल रील अशा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सवातील भक्ती, परंपरा आणि उत्सवाचे विविध पैलू प्रभावीपणे मांडणाऱ्या सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचेही कौतुक केले.
रत्नागिरीच्या या उपक्रमाचा विस्तार पुढील वर्षी मुंबईसह संपूर्ण कोकणात आणि त्यानंतर महाराष्ट्रभर व्हावा, अशी अपेक्षा यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केली. आपल्या गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती आणि वारसा नव्या पिढीच्या कल्पकतेतून जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांना निश्चितच प्रोत्साहन दिले जाईल, असे मा. ना. उदय सामंत ह्यांनी सांगितले.
ना. उदय सामंत ह्यांनी या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह देऊन गौरविले.






















