*शिवाजी पार्क येथील आंदोलन हा देशविरोधी कारस्थानाचा भाग; शिवरायांचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही – मंत्री नितेश राणे*
*मुंबई, दि. १ ऑक्टोबर २०२६:*
मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रस्तावित असलेले आंदोलन हे दिल्लीतील जंतर-मंतरवरील देशविरोधी आंदोलनाचाच भाग-२ आहे. आंदोलनाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा अवमान करण्याचा अजेंडा चालवला जात असून, महाराष्ट्र हा अपमान कदापि सहन करणार नाही, असा घणाघात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज मुंबईत केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
*काय म्हणाले नितेश राणे?*
१. आमचा विरोध व्यक्तीला नसून देशविरोधी अजेंड्याला आहे.
२. सोशल मीडियावरील एका ग्राफिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची आक्षेपार्ह तुलना करून घोर अपमान करण्यात आला आहे.
३. ठाकरे बंधूंवर टीका – शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ठाकरे बंधू अशा आंदोलकांना पाठिंबा देत आहेत. हा बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग आहे.
“आमच्यासाठी पक्ष आणि पदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि आमची अस्मिता सर्वोच्च आहे,” असे राणे म्हणाले.
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, पण आंदोलनाच्या आडून औरंगजेब किंवा टिपू सुलतानचा अजेंडा राबवून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर पोलीस प्रशासन गंभीर दखल घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
*प्रमुख मागण्या:*
१. आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आयोजक अभिजित दिपके यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी.
२. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी.
#Mumbai #ShivajiPark #NiteshRane #BJP #ShivajiMaharaj #MaiMedia24
—
*






















