Home अग्रलेख कितीही मोठं संकट आलं तरी हतबल न होता सामोरं जाणं – म्हणजे...

कितीही मोठं संकट आलं तरी हतबल न होता सामोरं जाणं – म्हणजे जोडीदार

76
0

कितीही मोठं संकट आलं तरी हतबल न होता सामोरं जाणं – म्हणजे जोडीदार!

*१. बाईचं तेज – ती द्रौपदी नाही, ती स्वतः श्रीकृष्ण आहे!*
तिच्या करारी बाण्याने दरारा! तिला हाक मारायची गरज नाही! पुण्याईने जोडलेली माणसं येतील याची वाट पाहणारी ती द्रौपदी नाही! ती शिवभक्ती समावेशन ऊर्जा आहे! तिची संपदा तिला भार नाही, कारण ती स्वतः श्रीकृष्ण असते! “शस्त्र उठाओ द्रौपदी, अब गोविंद न आयेंगे” – हे तिला सांगायची गरज नाही, कारण ती जगरहाटीतील दानव ओळखते! ती दुर्गा आहे, दामिनी आहे, नारायणी आहे! म्हणूनच नवरा चांगला शिक्षक असावा – व्यवहारिक!

*२. तीच खरी कथा – “अहो, मी गेले तर तुम्ही कसं जगाल?”*
मुलं परदेशात सेटल झाली, आपण दोघेच! सगळं आहे, पण वय वाढतंय! या विचाराने झोप येत नाही! तेव्हा एकाने विचारावं – “मी नसेन तर तू कशी जगशील?” प्रेम म्हणजे मिठी नाही, सक्षम करणं! मी नसलो तरी तू ताठ उभी राहशील इतकं तयार करणं! हाच आधार आणि सक्षम जगणं!
*नवऱ्याने विचारले १५ प्रश्न – आजच स्वतःला विचारा!*
पैसा – ATM, UPI, OTP, GPay, PhonePe येतं का? आणीबाणी – रात्री २ वाजता 108 ला फोन? Ola/Uber बुक? Emergency नंबर? संपर्क – Video Call, Live Location पाठवणं, Google Map? कागदपत्रं – विमा कार्ड, डॉक्टरचा नंबर, बँक FD, आधार-पॅन, लाईट-गॅस बिल कुठे? आपली चूक एकच – “तो आहे, ती आहे” म्हणून शिकलोच नाही!

*३. तयारी काय करायची? – आर्थिक, मानसिक, सामाजिक – लग्नापासूनच!*
आर्थिक सक्षम – तुझं-माझं नाही, आपलं! दोघांच्या नावावर माहिती, दोघांना येतं! लग्नापासूनच! मानसिक सक्षम – रडू येईल, पण खचायचं नाही! “तो नाही घरी, तो माझ्यात आहे” हे तेज लग्नापासूनच! सामाजिक सक्षम – जोडलेली माणसं, केलेली पुण्याई हीच संपत्ती! रोज काही क्षण- हातात हात, अंगणात/घरी चहा, निसर्गाचा आनंद घेणे!हा नैसर्गिक आनंद बाजारात मिळत नाही!
*MAI MEDIA 24 फॉर्म्युला -* एक वही – “आमची दोघांची”! फ्रिजवर ३ नंबर – डॉक्टर, रुग्णवाहिका, मुलगा! तू मला भाकरी शिकव, मी तुला GPay शिकवतो!

*४. जगेपर्यंत एकमेकांना धरून सोबत!*
जिंदगी उपरवाले के हाथ में है! कोण कधी कसं जाईल सांगता येत नाही!.. म्हणून एकत्र जायचं असेल तरी मागचं आवरून जायचं! आणि एकटं राहायची वेळ आली तरी ताठ उभं राहायची तयारी हवी! संध्याकाळी दिवा विझताना रडण्यापेक्षा, भर दुपारीच सावलीची तयारी असायला हवी!

*५. तीही आपलीच! – घरातील पाळीव प्राणी!*
आपल्या घरी पाळीव प्राणी – कुत्रा, मांजर असेल तर तीही आपलीच! ती बोलत नाही, पण त्यांना सगळं कळतं! तुम्ही आजारी असाल तर ते पायापाशी येऊन झोपणे! सकाळी चेहऱ्यावर हात फिरल्यासारखं उठावने ! ज्याला मुक्या जीवाचं प्रेम कळलं, त्याला माणूसपण कळलं! नवरा-बायको म्हणजे शेवटपर्यंत साथ देतो तो पण जोडीदार!

*६. शेवटचा विचार – मुलांना संपत्तीचा वारस नाही, माणूस करा!*
आपण काय करतो? मुलांसाठी प्लॉट, फ्लॅट, FD, सोनं! पण पोराला माणूस केलं का? संपत्ती वाटली जाते, पण माणूसपण रक्तात येतं! प्लॉट नाही, संस्कार देणे महत्वपूर्ण! FD नाही, आधार द्या! सोनं नाही, तेज द्या! मुलं अभिमानाने जगतील – संपत्तीने नाही, माणूस म्हणून!

> “मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही” – हे प्रेम! ❤️ “तू नसशील तरी मी उभा राहीन” – इतकं सक्षम करणं – हेच जीवन!
*लग्न मंडपात होतं, पण जोडीदारपण रोज घडतं!*
_MAI MEDIA 24_ 🙏🧡
#NavraBayko #Jeevansathi #SakshamSajag #MaiMedia24 #Panchami

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here