*अडसूळ यांच्या पॅनलचा दारुण पराभव; खातेही उघडता आले नाही!*
*कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनलचा १५ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय*
मुंबई- को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन (मुंबई बँक युनिट) निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. अडसूळ यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नसून खातेही उघडता आले नाही.
भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर आणि प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लढलेल्या कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनलने १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
या निकालामुळे मुंबई बँक युनिटमधील कर्मचारी वर्गाचा कौल स्पष्ट झाल्याचे दिसून आले. एकही जागा विरोधकांच्या खात्यात न जाता सर्व १५ जागांवर विजय मिळाल्याने विजयी पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
00000






















