“सज्ज आहेत माझे हात” – अपोलो हॉस्पिटल्सच्या मोहिमेचा विश्वविक्रम ! 30 दिवसांत 61,221 जणांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
120 हून अधिक संस्थामधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेली ही मोहीम, “हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासाठी एकत्र येऊया” या थीमवर आधारित जागतिक हृदय दिन 2026 च्या पार्श्वभूमीवर सीपीआर विषयी जागरूकता आणि वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी सज्ज राहण्याचा संदेश घराघरात पोहोचवत आहे.
मुंबई, 28 सप्टेंबर 2026: ‘जीवन वाचवण्यासाठी नवी मुंबई सज्ज आहे का?’ – या एका प्रश्नातून सुरु झाली एक मोठी सीपीआर प्रतिज्ञा चळवळ.
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 8 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या काळात “सज्ज आहेत माझे हात” ही अभिनव मोहीम राबवली. यामध्ये अपोलोने 50,000 लोकांनी सीपीआर शिकण्याची शपथ घ्यावी तसेच वैद्यकीय आणीबाणीच्या परि… Read more






















