Home मुंबई *२ ऑक्टोबर रोजी टिळक भवनात ‘जेन-झी आंदोलन’ पोस्टर प्रदर्शन*

*२ ऑक्टोबर रोजी टिळक भवनात ‘जेन-झी आंदोलन’ पोस्टर प्रदर्शन*

38
0

*२ ऑक्टोबर रोजी टिळक भवनात ‘जेन-झी आंदोलन’ पोस्टर प्रदर्शन*

*• गांधी जयंतीनिमित्त तरुणाईच्या सर्जनशील पोस्टर्सचे प्रदर्शन – पेपरफुटी, बेरोजगारीवर भाष्य*
*• काँग्रेस प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन*

*मुंबई, दि. २९ सप्टेंबर २०२६:* दिल्लीसह देशभरात तरुणाई अर्थात *‘जेन-झी’* पिढीने रस्त्यावर उतरून पेपरफुटी, बेरोजगारी व शिक्षण व्यवस्थेवर आवाज बुलंद केला होता. त्या आंदोलनातील अनोख्या आणि उपरोधिक पोस्टर्सचे विशेष प्रदर्शन *२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त* मुंबईतील *टिळक भवन* येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित केले आहे.

जंतरमंतरसह देशभरातील आंदोलनात विद्यार्थ्यांनी हातात घेतलेल्या सर्जनशील पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच पोस्टर्सचे संकलन करून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

*उद्घाटन:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे *नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद* यांच्या हस्ते.
*वेळ:* सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले.
*आवाहन:* विद्यार्थी, युवक, कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे व नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी – *आयोजक युवराज मोहिते.*

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here