Home पुणे *राजकीय साहित्याच्या विचारविश्वाला डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सासवडमध्ये नांदी*

*राजकीय साहित्याच्या विचारविश्वाला डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सासवडमध्ये नांदी*

78
0

*राजकीय साहित्याच्या विचारविश्वाला डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सासवडमध्ये नांदी*

*• गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी दहावे नांदी साहित्य संमेलन ‘राजकीय साहित्य’ थीमवर*
*• आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात रंगणार वैचारिक मंथन*

*पुणे/सासवड, दि. २७ सप्टेंबर २०२६:* साहित्य आणि राजकारण यांचे नाते उलगडणाऱ्या विचारमंथनाला सासवडच्या ऐतिहासिक भूमीत पुन्हा एकदा नांदी मिळणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फौंडेशन, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि मसापच्या सासवड, सोपाननगर, जेजुरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने *गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी दहावे नांदी साहित्य संमेलन ‘राजकीय साहित्य संमेलन’* म्हणून आयोजित केले आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा *शिवसेना नेत्या, विधान परिषदेच्या माजी उपसभापती व विद्यमान आमदार डॉ. नीलम गोऱ्हे* सांभाळणार आहेत.

*कार्यक्रम पत्रिका:*
*स्थळ:* आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड
*वेळ:* सकाळी १० वा. सुरुवात, १०.३० वा. उद्घाटन
*उद्घाटक:* मसाप पुणेचे अध्यक्ष योगेश सोमण व समर्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे
*स्वागताध्यक्ष:* माजी जि.प. अध्यक्ष विजय कोलते
*प्रमुख पाहुणे:* पुरंदर-हवेली आमदार विजयबापू शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, मसाप कार्यवाह सुनील महाजन

*चर्चेचे विषय:* ‘राजकीय साहित्य’, ‘साहित्यामधील राजकीय व्यक्तिमत्त्वे’, ‘राजकीय साहित्य आणि विचारसरणी’ यावर व्याख्याने व परिसंवाद.

*मान्यवरांची उपस्थिती:* मधुकर भावे, माधव भंडारी, प्रा. नारायण टांक, डॉ. नाना पवार, प्रा. डॉ. जगदीश शेवते, फ. मु. शिंदे, रावसाहेब पवार, राजन लाखे, डॉ. पुरुषोत्तम काळे, प्रभाकर आव्हाळ.

*विशेष:* संवाद पुणे यांच्या वतीने *‘सत्यशोधक महात्मा’* हा प्रयोग सादर होणार आहे.

*निमंत्रक:* मसाप सोपाननगर – डॉ. नानासाहेब पवार, जेजुरी – डॉ. नारायण टाक, सासवड – अॅड. दिलीप निरगुडे.

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here