Home नागपूर *नागपूर एम्समध्ये डॉक्टरांचा बेमुदत संप – OPD ठप्प, रुग्णांचे हाल; ICU मध्ये...

*नागपूर एम्समध्ये डॉक्टरांचा बेमुदत संप – OPD ठप्प, रुग्णांचे हाल; ICU मध्ये घुसून डॉक्टरला मारहाण*

58
0

*नागपूर एम्समध्ये डॉक्टरांचा बेमुदत संप – OPD ठप्प, रुग्णांचे हाल; ICU मध्ये घुसून डॉक्टरला मारहाण*

*आरोपींना अटक नाही तोपर्यंत माघार नाही – RDA चा आक्रमक पवित्रा, आंदोलनाला विश्रांती देण्याचा निर्णय रद्द*
* *खासदाराच्या नावाने दबाव आणि VIP वशिलेबाजीचा आरोप – ‘No Special Treatment Policy’ लागू करण्याची मागणी*

*नागपूर, दि. २५ सप्टेंबर :* नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे एम्समध्ये उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.

*नेमकं काय घडलं?*
२२ सप्टेंबर रोजी MICU मध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. या रागातून रुग्णाच्या ८ ते १० नातेवाईकांनी थेट अतिदक्षता विभागात घुसून कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरला कॉलर पकडून खाली पाडले आणि मारहाण केली. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीच्या नावाचा वापर करून दबाव आणल्याचा गंभीर आरोप रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (RDA) केला आहे.

*आंदोलन का चिघळलं?*
गुरुवारी (२४ सप्टेंबर) डॉक्टरांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाशी चर्चा करून २८ सप्टेंबरपर्यंत आंदोलनाला विश्रांती देण्याचे ठरले होते. मात्र आरोपींना अटक झाली नाही आणि पीडित डॉक्टरच्या सुरक्षेची हमी मिळाली नाही, म्हणून RDA ने विश्रांतीचा निर्णय रद्द करत शुक्रवारी पुन्हा प्रशासनाला नोटीस दिली आणि बेमुदत संप सुरूच ठेवला.

*रुग्णसेवेवर परिणाम काय?*

– *ठप्प सेवा :* नियमित OPD, जनरल वॉर्ड आणि नियोजित शस्त्रक्रिया (Elective OT) पूर्णपणे बंद.
– *सुरू असलेल्या सेवा :* रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन विभाग (Emergency) आणि ICU सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

*डॉक्टरांच्या ५ प्रमुख मागण्या :*
१. वैयक्तिक FIR चे तात्काळ ‘संस्थात्मक FIR’ मध्ये रूपांतर करा.
२. हल्लेखोरांना २४ तासात अटक करा.
३. संबंधित खासदाराने खुलासा करावा आणि त्यांना एम्सच्या बॉडीतून काढून टाका.
४. वशिलेबाजी थांबवण्यासाठी ‘No VIP Culture’ धोरण लागू करा.
५. सुरक्षेसाठी ‘कोड व्हायलेट’, रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि अलार्म सिस्टीम बसवा.

जोपर्यंत मागण्यांवर लेखी आणि कालबद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा RDA ने दिला आहे.

*- माई मीडिया २४*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here