*माध्यमांच्या कार्यालयातील गणरायाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन; बळीराजासह जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना*
*मुंबई, दि. २४ सप्टेंबर:* उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईतील प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
दिवसभरात त्यांनी *झी २४ तास, एनडीटीव्ही मराठी आणि न्यूज १८ लोकमत (मराठी)* या तीनही वृत्तवाहिन्यांच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी भक्तिमय वातावरणात त्यांनी बाप्पाच्या चरणी महाराष्ट्रातील बळीराजासह प्रत्येक कुटुंबाला सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली.
झी २४ तास येथे संपादक कमलेश सुतार यांनी तर एनडीटीव्ही मराठी येथे संपादक जितेंद्र दीक्षित यांनी आणि न्यूज १८ मराठी येथे संपादक मंदार फणसे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी निवेदकांशी विविध विषयांवर संवादही साधला. एनडीटीव्ही कार्यालयात विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांचीही त्यांनी भेट घेतली.
> “श्री गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर होऊन सुख-समृद्धीचे मंगल पर्व नांदो”, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
*|| गणपती बाप्पा मोरया ||*
—






















