पालिका अधिकाऱ्यांनी जोपासली “”सामाजिक बांधिलकी”..!!
विशेष मुलांनी तयार केलेल्या राख्या विकत घेत,पालिका अधिकाऱ्यांनी दिला सहकार्याचा हात..!
कांदिवली वार्ताहर 7
अनिल चासकर
कांदिवली येथील रामकृष्ण शिक्षण मंडळाचे विशेष मुलांच्या कार्यशाळेला भेट देऊन आर /दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी. विशेष मुलांनी आपल्या हातांनी तयार केलेल्या राख्या,व भरत काम केलेले रुमाल पालिका अधिकारी सहायक अभियंता समीर सानप,दुय्यम अभियंता राहुल पवार दुय्यम अभियंता प्रदीप काजरोळकर,सहायक अभियंता हेमंत पंत, अभियंता चेतन पाटील आणि शुभम होळकुंडे यांनी विकत घेऊन विध्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कलेचे कौतुक केले.
श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाची सदाफुली कार्यशाळा (मानसिक दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांची कार्यशाळा)
सदाफुली कार्यशाळेत एकूण विद्यार्थी 35 शिक्षण घेत आहेत. पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांनी राखी सणाकरिता आकर्षित अशा सुंदर मण्यांच्या राख्या तयार केल्या आहेत.
राख्या बनविताना मुलांना काळजीपूर्वक सांगवे लागते. हाताला धरून कृती करावी लागते, एकदा का विध्यार्थ्याला समजले की ते अतिशय कुशलतेने काम पूर्ण करतात.तसेच
कार्यशाळेत विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, याकरिता ऑर्चीड ची फुले ,भरत काम केलेले रुमाल ,दिवाळीनिमित्त आकर्षित अशा पणत्या फिनेल , लिक्विड सोप, द्रोण, नैसर्गिकरित्या तयार केलेले उठणे असे विविध प्रकल्प कार्यशाळेत राबवली जातात. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विभाग प्रमुख पानेरी धावडे करतात तसेच शिक्षका रचना नांगराळे , लिपिक अनुराधा शिराळकर,वर्ग सहाय्यिका जयश्री सोलंकी या सर्वांचा मोलाचा सहभाग असतो. या कार्यशाळेतील विभाग प्रमुख पानेरी धावडे यांनी सोशियल मीडियावर”” विशेष मुलांनी तयार केलेल्या राख्या घ्या, विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्या”” असे आवाहन केले होते, त्या अनुषंगाने आर /दक्षिण विभागातील अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेच्या कार्यशाळेला भेट दिली.प्रत्येक अधिकाऱ्यांनी किमान 20 राख्या व रुमाल घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली, विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विध्यार्थ्यानी प्रत्येकाला स्वतः तयार केलेली कागदी फुले भेट देऊन अधिकारी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.
सहायक अभियंता समीर सानप
दैनंदिन व्यस्त कामातून फारच कमी वेळ स्वतः साठी मिळतो त्यात आज विशेष मुलांच्या कार्यशाळेला भेट दिल्याने, एक वेगळी जाणीव झाली. समाधान मिळाले.
विभाग प्रमुख पानेरी धावडे
विशेष मुलांसह प्रकल्प राबविताना, त्यांच्या मुडवर, काळजीपूर्वक दाखवावे लागते, एकदा समजल्यावर हे विध्यार्थी सातत्य चिकाटीने दिलेले काम पूर्ण करतात.






















