समतानगर बस आगाराची,..दयनीय अवस्था..!!
सेवा देणाऱ्या बस आगारा कडेच, बेस्ट व्यवस्थापनाचे दुर्लक्ष..?
कांदिवली वार्ताहर 7
अनिल चासकर
कांदिवली पूर्वेला असलेल्या समता नगर बस आगाराची दयनीय अवस्था झाली आहे. आगारात खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून, कार्यालयाची देखील बिकट परिस्थिती झाल्याने वाहक,चालक आणि आगार व्यवस्थापक कर्मचाऱ्यांसह, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहन चालक आणि वाहक मुकाट्याने लाथ्या बुक्क्याचा मार सहन करत आहे.आगाराची डागडुजी करा, निदान मोठ मोठे खड्डे तरी बुजवा अशी मागणी विध्यार्थी आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

समतानगर मध्ये अनेक बोर्डाच्या शाळा, पालिकेच्या शाळा महाविद्यालय आहेत. लोकवस्ती देखील मोठ्या संख्येने असल्याने बस आगारात नेहमीच विध्यार्थ्यांसह प्रवाशांची वर्दळ असतें.समता नगर बस आगारामधून
703,209 729,701223 बस ची वारंवारीता असून
मीरारोड, बोरिवली अंधेरी कांदिवली,जवळपास फेऱ्या वेळेत होतात. पहिली बस 6 वाजता आणि शेवटची 11 वाजेपर्यँत असल्याने प्रवासी संख्या देखील जास्त आहे. मात्र बस आगारात तसेच प्रवेश द्वारा जवळ मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच आगारात एका बाजूला पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्याने पाणी साचते यामुळे मच्छरांसह किटकांचा प्रादुर्भाव वाढत असून पावसाळी आजार बळवण्याची भीती प्रवाशांमध्ये निर्मण झाली आहे. तसेच खड्ड्यामुळे विध्यार्थी व प्रवाशांसह वाहक आणि चालकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कर्मचारी तक्रार करायला सोडा, बोलायला देखील धजत नाही. प्रवाशांनी तक्रार करायची कोणाकडे.? हा जटील प्रश्न भेडसावत आहे..
आगार कार्यालयाच्या खिडकीत पाणी येत असल्याने प्लास्टिक बांधले आहे. छताला गळती लागली आहे, काही ठिकाणी छाताच्या काही भागाची पडझड झाली आहे.चौकशी खिडकी जवळील लाद्या तुटून खड्डे पडले आहे. असे असून देखिल कोणीही बेस्ट कर्मचारी काहीही बोलण्यास तयार होत नाही.
अभियंता संजय राणे बेस्ट इमारत व बांधकाम विभाग
पहाणी करून डागडुजी करण्यात येईल.
प्रवासी दीपक भोसले (महिंद्रा कर्मचारी )
बेस्ट तोट्यात आहे असे शासनाकडून बोलले जाते.
आमदार, नगरसेवक फंडातून खाजगी सोसायट्या मध्ये लादिकरण,इतर कामांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात.
आमदारांनी काही फंड सेवा देणाऱ्या बस आगारासाठी वापरण्यास काय हरकत आहे.






















