Home मुंबई *SIR 2026 : काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर मतदार नोंदणीसाठी मुदतवाढीचे संकेत; ॲड. कोंडविलकर...

*SIR 2026 : काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर मतदार नोंदणीसाठी मुदतवाढीचे संकेत; ॲड. कोंडविलकर यांनी दिली सविस्तर माहिती*

47
0

*SIR 2026 : काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर मतदार नोंदणीसाठी मुदतवाढीचे संकेत; ॲड. कोंडविलकर यांनी दिली सविस्तर माहिती*

*मुंबई, दि. २३ सप्टेंबर:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काल मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र चोकलिंगम यांची भेट घेऊन SIR 2026 संदर्भात मुद्देसूद चर्चा केली. या बैठकीची सविस्तर फलश्रुती प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी दिली.

ॲड. कोंडविलकर यांनी सांगितले की, ASSDO यादीतील १ कोटी ५४ लाख आणि वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले सुमारे ४० लाख अशा एकूण १ कोटी ९४ लाख नागरिकांना नव्याने नोंदणी करावयाची आहे. मात्र आतापर्यंत केवळ २ लाख ८० हजार नोंदणी झाली आहे. दावे-हरकतींसाठी केवळ एक महिना (३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर) मुदत असून या काळात सण आणि फॉर्म ६ व ८ च्या चुकीच्या छपाईमुळे अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आयोगाने मुदतवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

*बैठकीतील प्रमुख निर्णय:*

*१.* फॉर्म नं. ६ व ८ नव्याने छापून वितरित केले जातील.
*२.* नागरिकांच्या सोयीसाठी दर शनिवार व रविवारी मतदान केंद्रावर विशेष मोहीम राबवून BLO अर्ज स्वीकारतील.
*३.* प्रत्येक विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष उघडून फॉर्म ६/७/८ स्वीकारले जातील.
*४.* BLA दररोज २ फॉर्म ६ देऊ शकतो, online अर्ज हा सर्वात सुरक्षित पर्याय असून आधारमुळे बोगस नोंदणी टळेल.
*५.* दुबार मतदारांसाठी Deduplication App वापरण्याची आणि १ कोटी २२ लाख Anomalies व Unmapped मतदारांची यादी प्रसिद्ध करण्याची काँग्रेसची मागणी मान्य करण्यात आली.

फॉर्म ६/७/८ ची यादी https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या वेबसाईटवर Claims and Objections during SIR 2026 या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. नाव वगळण्यासाठी फॉर्म ७ भरताना पुरावे देणे बंधनकारक असून, गठ्ठ्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व खोटा आक्षेप घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ॲड. कोंडविलकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here