Home मुंबई * सायन प्रतीक्षा नगर: धोकादायक T-३६, ३७, ५३, ५४ इमारतींबाबत मोठा निर्णय*

* सायन प्रतीक्षा नगर: धोकादायक T-३६, ३७, ५३, ५४ इमारतींबाबत मोठा निर्णय*

44
0

* सायन प्रतीक्षा नगर: धोकादायक T-३६, ३७, ५३, ५४ इमारतींबाबत मोठा निर्णय*

*उपसभापती सचिन अहिर यांच्या निर्देशानंतर म्हाडाला २ ते ३० दिवसांची मुदत; रहिवाशांना सायनमध्येच पर्यायी घरे आणि ३ वर्षात पुनर्विकासाचे आश्वासन*

मुंबई: सायन प्रतीक्षा नगर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना मोठा दिलासा. IIT रिपोर्टनुसार धोकादायक घोषित केलेल्या T-३६, T-३७, T-५३, T-५४ या चार इमारतींच्या पुनर्वसनासाठी विधानभवनात निर्णायक बैठक.
उपसभापती सचिन अहिर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०३/०९/२०२६ रोजी विधानभवन दालन क्र. ११४मध्ये झालेल्या बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल, मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, सह मुख्य अधिकारी उमेश वाघ, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी नगरसेवक मंगेश सातमकर व कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर भोगले उपस्थित होते.

या बैठकीचे अधिकृत इतिवृत्त दि. १५/०९/२०२६ (जावक क्र. २४८३/अ/स/MP/२०२६) रोजी विशेष कार्य अधिकारी प्रतीक पाखरकर यांनी म्हाडा उपाध्यक्षांना पाठवले असून ९ ठोस निर्णय घेण्यात आले:

*९ ठोस निर्णय:*

*१. २ दिवसात IIT रिपोर्ट द्या*
*२. १५ दिवसात रिकाम्या घरांची यादी जाहीर करून सायनमध्येच पर्यायी घरे द्या*
*३. प्रत्येकाला म्हाडाच्या लेटरहेडवर हक्काचे लेखी आश्वासन द्या*
*४. D-Line जवळील भूखंड क्र. ०५ वर पुनर्विकास करा*
*५. ३वर्षात पुनर्विकास पूर्ण करा*
*६. ‘अ’ वर्गाला कायमस्वरूपी घर*
*७. ‘ब’ व ‘क’ वर्गाला कोर्टाच्या निकालापर्यंत सायनमध्येच संक्रमण शिबीर – भाडे वगळता कोणतेही शुल्क नाही*
*८. ‘ब’ व ‘क’ वर्गासाठी ३०दिवसात शासनाकडे प्रस्ताव पाठवा*
*९. बायोमेट्रिक सर्वेक्षण तातडीने पूर्ण करा*

> *आपल्या हक्काच्या घरासाठी सदैव तत्पर – सायन प्रतीक्षा नगर संक्रमण शिबिर पुनर्वसन कृती समिती*

 

3 फोटो + 3 पानी पत्रासह लावा माऊली –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here