गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांच्याकडून घाटकोपर मेट्रो स्थानकाची पाहणी*
* प्रवाशांशी थेट संवाद साधून नागरी सुविधांचा घेतला आढावा; गर्दी नियंत्रण आणि कोच वाढवण्यावर चर्चा*
मुंबई, दि. २२ सप्टेंबर २०२६: श्रीगणेशोत्सव काळात मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन महापौर रितू तावडे यांनी आज घाटकोपर मेट्रो स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.
सण काळात मुंबईकरांचा प्रवास सुकर, सुरक्षित व गतिमान व्हावा या उद्देशाने महापौरांनी मेट्रो स्थानकावरील सुविधा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांचा आढावा घेतला.
मेट्रो प्रशासनाच्या सुविधा आणि प्रवासाच्या अनुभवाविषयी महापौरांनी प्रवाशांशी थेट संवाद साधला. प्रवाशांच्या सूचना आणि समस्या जाणून घेऊन प्रवासाचा दर्जा उंचावण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गर्दी नियंत्रण, पीक अवर्सचे नियोजन, दैनंदिन प्रवासी संख्या, तिकीट दर आणि भविष्यात कोचेसची संख्या वाढवण्याच्या योजनेवर चर्चा केली. महसूल वाढीसाठीच्या नियोजनाचाही आढावा घेतला.
मेट्रो आणि महापालिका प्रशासनात अधिक समन्वयासाठी सर्व सहकार्य पुरवले जाईल, असे महापौरांनी आश्वस्त केले.
यावेळी मेट्रोचे व्यवसाय प्रमुख अजय कुमार, उपमहाव्यवस्थापक मयंक रावत, वरिष्ठ व्यवस्थापक अल्पेश नागदा, महापालिकेच्या ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र हांगे उपस्थित होते.
*- MAI MEDIA 24*
—






















