Home मुंबई श्री सिद्धिविनायक मंदिरात पार्थिव गणपती बाप्पाचा भव्य विसर्जन सोहळा 

श्री सिद्धिविनायक मंदिरात पार्थिव गणपती बाप्पाचा भव्य विसर्जन सोहळा 

61
0

श्री सिद्धिविनायक मंदिरात पार्थिव गणपती बाप्पाचा भव्य विसर्जन सोहळा

*मुंबई:* श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात विराजमान झालेल्या पार्थिव गणपती बाप्पाचे रविवारी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषाने दादर परिसर दुमदुमून गेला.

या सोहळ्यात मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) *सदानंद सरवणकर*, कोषाध्यक्ष *आचार्य पवन त्रिपाठी*, विश्वस्त *राहुल लोंढे, महेश मुदलियार, सुदर्शन सांगळे, मनिषा तुपे, राखी चव्हाण* आणि कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोठ्या संख्येने भाविकांनी या विसर्जन सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

*गणपती बाप्पा मोरया!*

#Siddhivinayak #GanpatiVisarjan #Mumbai #Dadar #MAIMEDIA24

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here