*मुंबई उपनगरात गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकसंवादाचा जागर*
मुंबई: गणेशोत्सवाच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि सेवांची माहिती गणेश मंडळांच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
वांद्रे आणि खार परिसरातील मंडळांना भेट देऊन अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
*भेट दिलेली मंडळे:*
– वांद्रेचा सम्राट, खेरवाडी – अध्यक्ष सागर रेड्डी
– वांद्र्याचा महाराजा, खेरवाडी रोड – अध्यक्ष सौरभ ननावरे
– शिव शक्ती मित्र मंडळ, खार – अध्यक्ष विजय मिश्रा
– शांतीलाल कंपाऊंड मंडळ, खेरवाडी – अध्यक्ष प्रवीण शेलार
– किंग डॉलर मंडळ, खार – अध्यक्ष भूपेंद्र सिंग
यावेळी २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ मेळाव्या’ची माहितीही युवकांना देण्यात आली.
विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर, संजय ओरके, नंदना गजभिये, आनंदा कांबळे आदींनी समन्वय साधला.
—






















