Home मुंबई *लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाला रामदास आठवलेंची भेट* – *दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांना...

*लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाला रामदास आठवलेंची भेट* – *दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार*

71
0

*लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाला रामदास आठवलेंची भेट* – *दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार*

*पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या किंग हेन्री रोडवरील स्मारकाची पाहणी, व्हिडिओ दालन उभारण्याची सूचना*

*लंडन/मुंबई, दि. 20 -* लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2015 रोजी या स्मारकाचे लोकार्पण झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे किंग हेन्री रोडवरील निवासस्थान संग्रहालयरूपी स्मारक म्हणून उभारण्यात आले आहे.

या स्मारकाला ना. आठवले यांनी आज भेट देऊन स्मारकाची पाहणी केली. या संग्रहालय स्मारक इमारतीची डागडुजी व दुरुस्ती करण्याची गरज असून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाच्या संवर्धन आणि देखभालीसाठी नव्याने दुरुस्ती करण्याची मागणी करणार असल्याचे ना. आठवले यांनी कळविले आहे.

तसेच या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र, त्यांची संविधान सभेतील भाषणे तसेच त्यांची अनेक गाजलेली महत्त्वाची भाषणे दाखविणारे व्हिडिओ दालन या संग्रहालयात उभारले पाहिजे, अशी आपली सूचना असल्याचेही ना. आठवले यांनी कळविले.

यावेळी ना. आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले, पुत्र जीत आठवले, चंद्रशेखर कांबळे, माधुरी चंद्रशेखर कांबळे, अविनाश कांबळे, माधुरी अविनाश कांबळे, गौतमी चंद्रशेखर कांबळे, दीक्षा चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.

*हॅशटॅग:* #RamdasAthawale #London #DrBabasahebAmbedkar #AmbedkarMuseumLondon #MAIMedia24

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here