Home मुंबई *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले...

*पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले म्हणून वाढदिवसाला ‘दिवे’ लावायचे?*

55
0

*पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले म्हणून वाढदिवसाला ‘दिवे’ लावायचे?*

*हा वाढदिवस नाही तर ‘काळा दिवस’ – हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात*

मुंबई/नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात २५ वर्षे पूर्ण केल्याने भाजपाकडून १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे.

_”मोदींनी आधी गुजरातची वाट लावली आणि नंतर देशाला २५ वर्षे मागे नेले. जनता महागाईने त्रस्त, तरुण बेरोजगार, शेतकरी संकटात, विद्यार्थी पेपरफुटीने बेहाल असताना कसला वाढदिवस साजरा करता? हा देशासाठी काळा दिवस आहे.”_

*सपकाळ यांनी मांडलेले ५ प्रमुख मुद्दे:*

*१. शेतकरी संकटात:* राज्यात कोरडा दुष्काळ, खरीप हंगाम वाया गेला. सरकारने केवळ कोरड्या चर्चा केल्या. तातडीने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार मदत द्यावी.

*२. मराठा आरक्षण:* सरकारची भूमिका आडमुठेपणाची. फडणवीस सरकार हेच महाराष्ट्रावरचे मोठे विघ्न आहे.

*३. UPI वर टॅक्स:* अमेरिकेच्या दबावामुळेच UPI व्यवहारावर टॅक्स लावण्याचा निर्णय. ही जनतेच्या खिशावर पाकीटमारी आहे.

*४. फडणवीसांना टोला:* प्रियंका गांधींना काय जबाबदारी द्यायची हे काँग्रेस ठरवेल, फडणवीसांनी काँग्रेसला सल्ला देऊ नये.

*५. २५ वर्षांचा हिशोब:* रुपया घसरला, कर्जाचा डोंगर वाढला, एकही आश्वासन पूर्ण नाही.

– *संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24*

#HarshwardhanSapkal #ModiBirthday #BlackDay #FarmersCrisis #MarathaReservation #UPITax #MAIMEDIA24

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here