*भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन*
मुंबई – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष *श्री नितीन नबीन* यांनी आज उपमुख्यमंत्री *एकनाथ शिंदे* यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व भक्तीभावाने आरती केली.
यावेळी शिंदे कुटुंबियांच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने अतिशय हृद्य स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस*, मंत्री *मंगलप्रभात लोढा*, भाजप प्रदेशाध्यक्ष *रवींद्र चव्हाण*, राष्ट्रीय महासचिव (संघटन) *शिव प्रकाश*, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार *अमित साटम*, स्नुषा *वृषाली श्रीकांत शिंदे* आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
*- संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24*
#NitinNabin #EknathShinde #DevendraFadnavis #GaneshUtsav2026 #MAIMEDIA24
—






















