Home पत्रकार  प्रिंट मीडिया संकटात! जाहिराती गायब, खप कोसळला – TOI ते लोकमतपर्यंत नोकरकपात,...

 प्रिंट मीडिया संकटात! जाहिराती गायब, खप कोसळला – TOI ते लोकमतपर्यंत नोकरकपात, डिजिटलचा महापूर: वास्तव भयंकर- शीतल हरीश करदेकर

159
0

प्रिंट मीडिया संकटात! जाहिरात गायब, खाप पक्षाला – TOI ते लोकांपर्यंत नोकरपात, डिजिटलचा महापूर

*स्लग:* प्रिंट-मीडिया-संकट-जहिराती-गयाब-खाप-कोसल्ला-तोई-ते-लोकमतपर्यंत-नोकरकपट-डिजिटल-महापूर-फायनल-1

* विशेष / MAI मीडिया 24

*वृत्त: जे सत्य सांगतात | सद्रक्षण खल दमनाय | माई मीडिया 24*

*मुंबई, ४ सप्टेंबर २०२६ – MAI MEDIA 24 विशेष ग्राउंड रिपोर्ट | संपादक: शीतल हरीश करदेकर*

प्रिंट मीडिया मरण पंथाला लागला आहे का? हा प्रश्नच चुकीचा आहे. खरा प्रश्न आहे – प्रिंटला कोणी मारले? उत्तर एकच – डिजिटलने नाही, तर खोटे RNI वाले, खाण माफिया, इव्हेंट बाजार आणि मालकांनीच मारले आहे.

*१. जाहिराती गायब – कोट्यवधींचा फटका:*
वृत्तपत्राचं ७०% उत्पन्न जाहिरातीतून येतं. पण आता सरकारी, खाजगी, बिल्डर, ज्वेलर्स सगळ्यांनी जाहिराती गुगल, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामवर वळवल्या आहेत. कारण तिथे कमी खर्चात थेट ग्राहकापर्यंत पोहोचता येतं. परिणामी कोट्यवधींच्या जाहिराती प्रिंटमधून गायब झाल्या आहेत.

*२. खप घसरण – तरुण हिंदी दुरावली:*
सकाळी चहा + पेपर हे समीकरण संपलं. चहा + स्मार्टफोन आलं. मोफत, सेकंदात बातमी मिळते. सोसायट्यांमध्ये खप निम्म्याहून कमी झाला. पेपरवाला दिसेनासा झाला. तरुण पिढीचा प्रिंटशी संबंधच संपला.

*३. खर्च तिप्पट – गणितच बिघडलं:*
एकीकडे उत्पन्न गायब, दुसरीकडे न्यूजप्रिंट, शाई, ट्रान्सपोर्टचा खर्च दुप्पट-तिप्पट. २ ते ५ रुपयात पेपर विकून २५-३० रुपयाचा खर्च भरून निघत नाही.

*४. कोण कपात करतंय? – MAI MEDIA 24 एक्सक्लुझिव्ह:*
हे लॉकडाऊनपासून सुरू आहे, आता वेग आला.
– *टाइम्स ग्रुप:* नागपूर ११ जण, पुणे मिरर प्रिंट बंद, मुंबई मिरविली. संडे मॅगझीन टीमला व्हिडिओ कॉलवर निरोप.
– *लोकमत:* रत्नागिरी, नागरात, मजिठिया मागितला म्हणून बडतर्फ. जिल्हा आवृत्त्या मर्ज/बंद.
– *सकाळ टाइम्स दिल्ली:* ७० जणांना एका दिवसात नोटीस – “तुमची गरज नाही”.
– *HT, एक्सप्रेस, भास्कर:* HT ५% ते १५% पगार कपात, एक्सप्रेस ३०% कपात, भास्कर १००० कर्मचाऱ्यांचा पगार रिस्ट्रक्चर.
– *इतर:* हमारा महानगर ३ आवृत्त्या बंद, फ्री प्रेस जर्नल संडे स्पेशल बंद, दिव्य मराठी ब्युरो बंद, आफ्टरनून डिस्पॅच प्रिंट आणि मग ऑनलाईनही बंद.

*५. खरा घोटाळा – खोटे आरएनआय वाले:*
खप ५०० नाही, प्रिंटिंग मशीन नाही, हॉकर नाही, ऑफिस नाही – फक्त कागदावर RNI आहे. पण DAVP, जिल्हा माहिती कार्यालय, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या जाहिराती हेच लाटतात. महिन्याला ५-१० लाख बिनबोभाट. यांच्यामुळेच खऱ्या दैनिकांच्या जाहिराती कमी झाल्या.

*६. मजिठिया आले बेकारी लाया म्हणणारे चमचे आज गप्प का?*
मजिठिया वेज बोर्ड मागितला म्हणून पत्रकारांना काढतात. पण पत्रकार संघटना, संपादक परिषदा गप्प. कारण मालकांच्या जाहिरात, इव्हेंटच्या तुकड्यावर जगतात.

*७. मिल पॅटर्न – तोच इतिहास परत:*
गिरणी मालकांनी मुंबईत जमिनी लाटल्या, कामगार देशोधडीला लावला, मग गिरण्या तोट्यात दाखवल्या. तोच पॅटर्न आज प्रिंटमध्ये. RNI च्या नावावर MIDC प्लॉट, शासकीय जागा, कोट्यवधींची खाण, क्रशर परवाने लाटले, आता पेपर तोट्यात सांगून पत्रकारांना घरी बसवत आहेत.

*८. बुद्धिबळात राजानेच आपल्या सोंगट्या उडवल्या:*
बातमी काय छापायची हे मंत्रालयातून, पक्ष कार्यालयातून ठरतंय. संपादक कोण होणार हे कोणत्या नेत्याच्या जवळ आहे यावर ठरतंय. बातम्यांची आणि संपादक नेमणुकीची शरणागती पत्करली.

*९. संपूर्ण साखरसारखे भरपाई मागतील*
उद्या हेच मालक म्हणतील – “आमचा पेपर बुडीत झाला, सरकारने पॅकेज द्या, सवलतीच्या दरात कागद द्या, जागा द्या” – जसे बुडीत साखर कारखाने भरपाई मागतात.

*१०. गोदी मीडिया आणि वाचण्यासाठी ६ उपाय:*
खाण परवाना हवा, जागचा एनए हवा, इव्हेंटला मंत्री हवा म्हणून गोदी मीडिया बनले. यातून बाहेर पडावे लागेल तर:
१) ‘काल काय घडले’ पेक्षा ‘का आणि कसे घडले’ सांगा – विश्लेषण.
२) विश्वासार्ह कमवा – फेक न्यूजतावा.
३) डिजिटल फर्स्ट – फक्त PDF ई-पेपर नको, पॉडकास्ट, व्हिडिओ, ६० शब्दात संदेश, कडक Paywall.
४) हाय-लोकल मजबूत करा – गल्ली, वॉर्ड, तालुकची खबर.
५) चमचेगिरीधवा – पुन्हा चौथा स्तंभ बना.
६) तरुणांसाठी – करिअर, तंत्रज्ञान, पैसा, पर्यावरणावर कंटेंट.

*निष्कर्ष:*
प्रिंटला डिजिटलने नाही, तर पॅट खोट्या RNI खोट्या, प्लगिन्स आणि धारकर्जिण्या चमचे मिलचे वाल्ले मारले आहेत. सरकारचे खासमखास, खोटे RNI वाले टिकतील, पण खरा मीडिया जगायला हवाच,

*वृत्त: जे सत्य सांगतात | सद्रक्षण खल दमनाय*
*संपादक: शीतल हरीश करदेकर |

| माई मीडिया २४*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here