Home Trending Now मराठी माय आमची, परप्रांतीयांची ही मावशी? मुख्यमंत्री १ वर्षाची मुदतवाढ कशासाठी? सहकारी...

मराठी माय आमची, परप्रांतीयांची ही मावशी? मुख्यमंत्री १ वर्षाची मुदतवाढ कशासाठी? सहकारी मंत्र्यांची गळचेपी कशासाठी?* *महाराष्ट्राची मराठी ही व्यवहार भाषा – तीच महाराष्ट्रात चालणार!*

55
0

 

मराठी माय आमची, परप्रांतीयांची ही मावशी? १ वर्षाची मुदतवाढ कशासाठी? सहकारी मंत्र्यांची गळचेपी कशासाठी?*

*महाराष्ट्राची मराठी ही व्यवहार भाषा – तीच महाराष्ट्रात चालणार!*

MAI MEDIA 24 | महा-अग्रलेख | ३१ ऑगस्ट २०२६ |
शीतल हरीश करदेकर | संपादक

●१. अभिजात दर्जा – ३ ऑक्टोबर २०२४ चा ऐतिहासिक शिक्का:●
केंद्र सरकारने मराठीसह ५ भाषांना अभिजात दर्जा दिला. आधी ६ होत्या, आता ११. पंतप्रधान म्हणाले – “हा मराठीच्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा सन्मान आहे.”

●२. त्याचे खरे फायदे काय? हे शोभेसाठी नाही! (PIB नुसार):●
२ मोठे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
Centre of Excellence ची स्थापना
-UGC मार्फत केंद्रीय विद्यापीठात Marathi Chairs
प्राचीन ग्रंथ – ज्ञानेश्वरी ते महानुभाव – जतन, दस्तऐवजीकरण, डिजिटायझेशनमधून रोजगार निर्मिती. हा पैसा नाही, हा वारसा आहे!

●३. भाषावार प्रांतरचना – घटनात्मक हक्क, भीक नाही:●
१ मे १९६० – महाराष्ट्र मिळाला तो भाषेवर! १०६ हुतात्म्यांनी रक्त सांडले ते मराठीसाठी. घटना म्हणते – भाषेवर राज्य दिले तर त्या भाषेचे रक्षण हे कर्तव्य आहे. अभिजात दर्जा हा त्या करारावर दिल्लीने मारलेला शिक्का आहे. तो तुटू नये!

●४. कोर्टाने दोनदा शिक्कामोर्तब केले – कायदा काय म्हणतो?●
मुंबई हायकोर्ट (फेब्रु २०२२) आणि सुप्रीम कोर्ट (२०२३) – मराठी पाटीचा नियम कायम. सुप्रीम कोर्ट – “Mumbai is capital of Maharashtra. Put a board, what is difficulty?”
●अकोला उर्दू पाटी केस (एप्रिल २०२५) ● कायदा इतर भाषेला मनाई करत नाही, मराठीसोबत इतर भाषा चालेल. म्हणजे मराठी सक्ती घटनात्मक आहे, द्वेष नाही!

●५. मग १ वर्षाची मुदतवाढ कशासाठी? – खरा फॅक्ट:●
परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक – ४०००+ नोटीस, १५ ऑगस्ट डेडलाईन. मराठी भाषा मंत्री ना. डॉ. उदय सामंत – १८०० शिक्षक, १८० केंद्र, पुस्तिका, व्हिडिओ रेकॉर्डिंगसह परीक्षा – क्रांती कारक नियोजन!
मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले – “बहुतांश चालक फार शिकलेले नाहीत, वेगवेगळ्या वयोगटाचे, ३ महिन्यात शक्य नाही, ते शिकायला तयार आहेत, वेळ द्या.” म्हणून शिक्षणात्मक मॉडेल.
प्रश्न – या १ वर्षात खरच प्रत्येक RTO त क्लास लागणार का? की दिल्लीहून २ पत्रे आली म्हणून परत मुदतवाढ?

●६. सहकारी मंत्र्यांची गळचेपी कशासाठी?●
एकाच कॅबिनेटमधले आपलेच दोन मंत्री – ना.सरनाईक आणि ना. सामंत – यांनी मराठीसाठी सडेतोड कृतीशील भूमिका घेतली, तर त्यांचेच खच्चीकरण का? त्यांची गळचेपी कशासाठी? हा मराठीचाच अपमान नाही का?

●७. “यांच्या जीवावर मुंबई चालते” – हा माज आणि संभ्रम दूर:●
BMC चा ८०% महसूल – गिरगाव, दादर, लालबागच्या मराठी मध्यमवर्गाचा. BEST, रेल्वे, पोलीस, शिक्षक, नर्स – ७०% मराठीच. ऑटो/टॅक्सी हा वाहतुकीचा फक्त १२% भाग. मुंबई कोणाच्या दयेवर नाही, ती हुतात्म्यांच्या बलिदानावर आणि मराठी करदात्याच्या घामावर चालते. सगळे कष्टकरी पूज्यच, पण “आमच्यामुळे मुंबई चालते” हा अराठींचा माज मराठीविरोधी आहे.

●८. उपाय – क्रांतीची गरज इथे आहे!●
आपल्या स्थानिक मराठी मुलांना परवाना आणि गाड्या कर्जाऊ (लोन) वर देऊन स्टार्ट-अपचा फायदा द्या – नोकर नाही, मालक बनवा! रोजी-रोटी मार्गी लागेल.

●९. इथे क्रांतीची गरज आहे!●
ना. सरनाईक, ना. डॉ. सामंत, ना. एकनाथ शिंदे… तुम्हीच या लढ्याचे शिलेदार आहात! तुम्हीच या मुदतवाढीला उचित आणि योग्य दिशेने अंमलबजावणीत बदलण्याची गरज आहे.!

●१०. मायमराठीचा ची भूमिका●
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टाईम दिल्ली
तख्तावर अवश्य आणि खुशाल बसावे, त्यासाठी शुभेच्छा! .. पण मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी प्रतारणा करून अजिबात नाही… भाषावार प्रांतरचना तुटू नये!

*मराठी ही फक्त भाषा नाही, ती ओळख आहे • विचार आहे • लढा आहे! त्याला कोणीही धक्का लावू नये…
आम्हाला आठवतय याच महाराष्ट्राने कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी अचानक लाॅकलाऊन जाहीर केल्यावर परप्रांतात जाणाऱ्यांना सर्वार्थाने मदत केली तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात बाहेरील राज्यातून येणाऱ्या आपल्या च मातीत जन्मलेल्या नागरिकांवर सैनिकांची होलसेल फवारणी केली होती.
महाराष्ट्राने देशभरातील लोकांना जगण्याचा आधार दिला..
कर्मभूमी आहे महाराष्ट्र! मग त्याची परतफेड अपेक्षित नाही. पण स्थानिकांना नोकरी काम प्रथम हेच धोरण हवं… मराठी आमची माय आणि इतर भाषिकांची मावशी आहे…हे जर भान ठेवलं गेलं तर सगळं सुकर होईल…पण या विषयाचे राजकारण दिल्ली आणि गल्लीतले मराठी विरोधी दुकानदार करणार असतील तर ते कुणीही महाराष्ट्रीयन खपवून घेणार नाही…
मुख्यमंत्री पदी असणाऱ्या फडणवीसांनी तर राष्ट्र प्रथम सोबत महाराष्ट्र प्रथम मराठी प्रथम हे ब्रीद पाळायला हवय…

सद् रक्षणाय खल दमनाय – पण भाषा रक्षणाय सर्व प्रथमाय!_

_- शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24 – मराठीच्या स्वाभिमानाचा आवाज | http://www.maimedia24.in_

#MahaAgralekh #1VarshaMudatvadh #MarathiVyavharBhasha #AbhijatMarathi #BhashavarPrantrachana #Sarnaik #UdaySamant #EknathShinde #DevendraFadnavis #MAIMEDIA24

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here