Home मुंबई *मुंबईत एकाच दिवशी २५ चिमुकल्यांना मिळाले हक्काचे घर – जिल्हाधिकारी सौरभ कटियार...

*मुंबईत एकाच दिवशी २५ चिमुकल्यांना मिळाले हक्काचे घर – जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची माहिती*

14
0

*मुंबईत एकाच दिवशी २५ चिमुकल्यांना मिळाले हक्काचे घर – जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची माहिती*

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेत एकाच दिवशी *२५ बालकांची कायदेशीर दत्तक प्रक्रिया* पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे संस्थात्मक संगोपनात असलेल्या २५ चिमुकल्यांच्या आयुष्यात नवी पहाट उजाडली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी *सौरभ कटियार* यांनी दिली.

*कशी झाली प्रक्रिया?*

केंद्रीय दत्तक-ग्रहण संसाधन प्राधिकरणाच्या (CARA) https://cara.wcd.gov.in मार्गदर्शक सूचनांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. ‘बालकांचे सर्वोत्तम हित’ या तत्त्वाला प्राधान्य देऊन कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर बालकांना दत्तक पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

प्रशासकीय कारणांमुळे दत्तक प्रक्रियेला विलंब होऊ नये यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाने उत्तम समन्वय साधला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मीरा गुडिले, जिल्हा परिवेक्षा अधिकारी सपना यंदे यांच्या समन्वयाने आणि विभागीय आयुक्त सुवर्णा पवार, आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम यशस्वी झाली.

*मुंबई उपनगरातील यंत्रणा:*

जिल्ह्यातील तीन विशेष दत्तक संस्थांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे संगोपन केले जाते. सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय रुग्णालयांत आढळलेली बालके विहित प्रक्रियेनुसार दाखल करून त्यांची नोंदणी केली जाते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बालकांना दत्तकसाठी मुक्त घोषित केले जाते आणि माहिती CARA पोर्टलवर टाकली जाते.

इच्छुक पालक CARA संकेतस्थळावर नोंदणी करतात. विशेष दत्तक संस्थेची समिती, बाल संरक्षण अधिकारी, डॉक्टर आणि पालक यांच्या पडताळणीनंतर बालक स्वाधीन केले जाते.

*४ मे २०२६ पासून जिल्हाधिकाऱ्यांना दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार* देण्यात आले आहेत. त्यानुसार ही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली. या मोहिमेमुळे दत्तक प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरत आहे.

*वाचा सविस्तर: http://mai24news.in*

*#MumbaiAdoption #CARA #SaurabhKatiyar #ChildWelfare #MumbaiSuburban #MaiMedia24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here