Home धुळे / नंदुरबार / जळगाव / अहिल्यानगर टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती, समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती, समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

29
0

_टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती, समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली_

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका) –
समृद्धी महामार्ग लगत टाकळीवाडी ता. गंगापूर येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला आज सायं. ५ वा. गळती लागली.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी माहिती दिली की खबरदारी म्हणून:
👉 _साखळी क्र. ४४७ ते ४७० (३० किमी – हडस पिंपळगाव ते माळीवाडा) वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावर वळवली_

_मार्ग बदल:_
▪️ मुंबईकडून जाणारी वाहने – हडस पिंपळगाव इंटरचेंज वरून धुळे-सोलापूर मार्गावर, माळीवाडा येथून पुन्हा समृद्धीवर
▪️ नागपूरकडून येणारी वाहने – माळीवाडा इंटरचेंज वरून धुळे-सोलापूर मार्गावर, हडस पिंपळगाव येथून पुन्हा समृद्धीवर

गेल कंपनीने दोन्ही बाजूचे व्हॉल्व बंद केले, पाईपलाईनमधील दाब कमी होत आहे. अग्निशमन यंत्रणा सज्ज!

📞 _नियंत्रण कक्ष: 1800 233 22 33 / 8181818155_

_- शीतल हरीश करदेकर_
_MAI MEDIA 24_
_वृत्त: जे सत्य समोर आणते | सद् रक्षणाय खल दमनाय_

#SamruddhiMahamarg #BreakingNews #ChhatrapatiSambhajinagar #GasLeak #MAIMEDIA24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here