*पिंपळवंडीत बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट – फास्ट ट्रॅक कोर्टात खटला, १० लाखांची{ मदत जाहीर*
*पुणे | MAI MEDIA 24 | २७ ऑगस्ट*
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.
शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
*कठोर कारवाई आणि फास्ट ट्रॅक खटला*
या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी यासाठी सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, वेगाने तपास पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी हा खटला *जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात)* चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
*पीडित कुटुंबासाठी मदत आणि पुनर्वसन:*
१. *तात्काळ आर्थिक मदत:* महिला व बालविकास विभागाच्या *मनोधैर्य योजनेतून १० लाख रुपयांची* मदत आजच कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातूनही मदत जाहीर.
२. *घरकुल:* पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी *शबरी घरकुल योजनेतून* तातडीने घर उपलब्ध करून देण्यात येणार.
३. *सुरक्षितता:* परिसरात महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी मोक्याच्या ठिकाणी *CCTV कॅमेरे आणि हायमास्क दिवे* तात्काळ बसवण्याचे निर्देश.
४. *दाखले शिबिर:* पिंपळवंडीतील वस्तीमध्ये जातीचे दाखले देण्यासाठी *विशेष शिबिराचे* आयोजन करण्यात येणार.
यावेळी आमदार शरद सोनवणे, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, जि.प. सदस्य छाया तांबे, कल्पना काळे, सोनाबाई दाभाडे, अमित बेनके, विकास दरेकर, देवराम लांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Pimpalwandi #Junnar #PuneNews #SunetraPawar #FastTrackCourt #MAIMEDIA24























