गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळास भेट देऊन पुष्पहार अर्पण करून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित आमदार सदा सरवणकर, आमदार भरतशेठ गोगावले आदी मान्यवरांनीही अभिवादन केले.




















